मुंबई : आज 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन आहे. याच दिनाचे औचित्य साधून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. काँग्रेसने मोदीचे एक फोटो कोलाज ट्विट करुन जागतिक पर्यटन दिनाचा शुभेच्छा दिल्या आहेत.
काँग्रेसने केलेल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विमानामध्ये जातानाचा अभिवादन करतानाचे 18 फोटो एकत्र केले आहेत. या फोटोंमध्ये मोदी विमानाच्या दाराशी जाऊन उपस्थितांना अभिवादन करताना दिसत आहेत.
आजच्या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून काँग्रेसने मोदींना लक्ष्य केलं आहे. या ट्विटमध्ये काँग्रेसने विमानाचे इमोजीही वापरला आहे. यामधून त्यांनी मोदींच्या परदेश दौऱ्यावरुन टीका केल्याचे स्पष्ट होत आहे.
पंतप्रधान मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी जून ते सप्टेंबर महिन्यांमध्ये दहा देशांना भेट दिली आहे.
2014 साली पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून मोदींनी 55 महिन्यांमध्ये 93 परदेश दौरे केले. त्या सर्व दौऱ्यांवर एकूण 2021 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
Happy #WorldTourismDay ✈️ pic.twitter.com/pPrRm9xOOn
— Congress (@INCIndia) September 27, 2019
महत्वाच्या बातम्या-
शरद पवारांसमोर ईडी नमलं की काय???; चौकशीची गरज नसल्याचे पवारांना पत्र – https://t.co/HaAroo5QnN @PawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 27, 2019
काँग्रेसच्या राजवटीतही एव्हढं टोकाचं राजकारण कधी झालं नाही- संजय राऊत – https://t.co/ZN2mXBwseB @rautsanjay61 @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 27, 2019
राष्ट्रवादीचे ‘हे’ बडे नेते पोहचले शरद पवारांच्या निवासस्थानी – https://t.co/fxCMCXPWDZ @NCPspeaks @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 27, 2019