लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थळाविषयी शरद पोंक्षे यांचं मोठं वक्तव्य!

मुंबई | आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी आता पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटलं आहे. पोंक्षे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थळावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) यांचा जन्म दापोली तालुक्यातील चिखली या गावी झाला होता. हे सर्वक्षृत आहे. आता पोंक्षे म्हणाले, लोकमान्य टिळकांचे जन्मस्थन काल्पनिक आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या घरात टिळकांचा जन्म झाला, असे सांगण्यात येते आहे, ते ठिकाण काल्पनिक असल्याचे पोंक्षे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर आता काय राजकीय आणि सामाजिक उलथापालथ होणार, हे पाहणं महत्वाचं आहे.

शरद पोंक्षेंच्या वक्तव्याने वाद निर्माण झाला नाही, असे कधी झाले नाही. काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर (V. D. Savarkar) यांच्या जीवनावर आधारीत पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत असताना, त्यांनी असेच वक्तव्य केले होते.

लहान मुलांना वि. दा. सावरकर कळाले पण, त्या दिल्लीतल्या 50 वर्षीय घोड्याला सावरकर कळाले नाहीत, असे पोंक्षे म्हणाले होते. त्यावेळी त्यांच्या या वाक्याचा रोष काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर होता.

जेवढा अपमान सावरकरांचा झाला, तेवढा आतापर्यंत कोणाचाच झाला नाही. आता जर त्यांचा अपमान बंद करायचा असेल, तर सावरकर नावाची दहशत वाढली पाहिजे. यापुढे सावरकरप्रेमी आला की, दहशत वाटली पाहिजे, सावरकर यांची दहशत ब्रिटिशांना होती, काँग्रेसला पण आहे. अन् ती दहशत आता वाढली पाहिजे, असे शरद पोंक्षे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

“प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो, शिंदे साहेब वाईट वाटलं”

टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे अब्दुल सत्तारांपर्यंत, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

बिहारमध्ये राजकीय भूकंप होणार?, नितीश कुमार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

‘ईडीविरोधात काँग्रेस रस्त्यावर, तुम्ही…’; शिवसेनेचा सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादीला प्रश्न

“चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय”