पुन्हा एकदा ‘या’ जिल्ह्याला महापुरचा धोका; 104 गावांना सतर्कतेचा इशारा

सांगली | आकाशातून जोरदार बरसणारा पाऊस, कोयना धरणातील पाण्याच्या विसर्गानं कृष्णा नदीला आलेला महापूर आणि त्यामुळे स्थलांतर करावं लागणाऱ्या कित्येक सांगलीकरांच्या जिवावर बेतलेला तो क्षण. मागच्या वर्षीच्या या सर्व आठवणी मनात ताज्या असतानाच आता पून्हा एकदा कृष्णा नदीला महापुर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस सातत्याने चालू आहे. कोयना धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच असल्याने 55 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग अद्याप चालू आहे. यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कृष्णा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवली जात आहे.

कृष्णा नदीकाठच्या 104 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सांगलीतील आयर्विन पूल येथील पाणी पातळी 37 फुटांवर पोहचली आहे तर कृष्णा नदीची धोका पातळी 43 फूट इतकी आहे.

दरम्यान, कृष्णा आणि वारणा नद्यांची पूरपरिस्थिती लक्षात घेता प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीच्या इशारा पातळीवर पाणी पोहचताच नागरिकांनी आपल्या जनावरांसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

वांग्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

काय सांगता! कोबी एवढा लाभदायी आहे; सविस्तर वाचा

“तुम्ही आमच्या देशात धंदा करायला आलाय”

“सुशांत कधीच आपल्या बेडरूमचा दरवाजा बंद करत नव्हता… सुशांतला त्याच्या स्टाफनेच मारलं”

राज ठाकरेंनी सुनील ईरावरांच्या कुटुंबियांसोबत फोनवरुन साधला संवाद, वाचा काय म्हणाले राज ठाकरे…