पुन्हा एकदा ऐकू येणार ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हा’ अभिनेता साकारणार छत्रपतींची भूमिका

मुंबई| छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट, मालिका आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. अशातच स्टार प्रवाह वाहिनीवर लवकच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्यांची आणि त्यांच्या साथीदारांची शौर्यगाथा पाहायला मिळणार आहे.

काही वर्षांपूर्वी स्टार प्रवाहवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेली एक मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे आपल्याला छत्रपतींच्या भूमिकेत दिसले होते. आता पुन्हा एकदा स्टार प्रवाहवर छत्रपतींच्या आयुष्यावर मालिका येत असून या मालिकेत अभिनेता भूषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेता भूषण प्रधान अनेक वर्षांनंतर टेलिव्हिजन वर कमबॅक करत आहे. तर या वेळी तो छत्रपती शिवाजी महारांच्या भूमिकेत दिसून येणार आहे. नुकतीच भूषणने याबाबतची माहिती सोशल मीडिया वर दिली.

नेताजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, जीवा महाला, तान्हाजी मालुसरे, कान्होजी जेधे,हंबीरराव मोहिते, कोंढाजी फर्जंद या शूरवीरांची नावं आपल्याला परिचित आहेत. ‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका या लवढय्यांच्या शौर्याला अर्पण असेल.

याविषयी सांगताना भूषण प्रधान म्हणाला, ‘छत्रपती शिवाजी महाराज साकारणं हे प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं. माझं देखिल स्वप्न पूर्ण होत आहे. मी बऱ्याच वर्षांपासून वाट पहात होतो की, आपल्याला कधी महाराजांची भूमिका साकारायला मिळेल. जबाबदारीचं भान नक्कीच आहे. त्यामुळे उत्सुकता आणि धाकधुक दोन्ही वाढली आहे. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी माझ्यसोबतच संपूर्ण टीम मेहनत घेते आहे. लूकपासून सेटपर्यंत सगळं काटेकोरपणे पाहिलं जातंय. आमचे वर्कशॉप्स घेतले जात आहेत.’

या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड महाराष्ट्राचच नव्हे तर आपल्या देशाचं आराध्य दैवत. महाराजांवर अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक, मालिका आणि चित्रपट निर्माण झाले आहेत. यातून छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा आपण पाहिली आहे. ती वर्णावी तेवढी थोडीच आहे.

पुढे ते म्हणाले की, या महान राजाच्या सेवेत अनेक रत्न होती ज्यांनी महाराजांच्या शब्दासाठी आपल्या देव देश आणि धर्मापायी प्राणांची आहुती दिली. अश्या शिलेदारांची गोष्ट सांगणारी मालिका जय भवानी जय शिवाजी सादर करताना अभिमान वाटतो आहे.  स्वराज्यासाठी लढलेल्या प्रत्येकालाच या मालिकेच्या निमित्ताने मानाचा मुजरा.

दरम्यान, रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींना रचला आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिका 2 मे पासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाहवर सुरु होत आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

राशीभविष्य: आज ‘या’ राशींच्या लोकांसाठी आहे…

जाणून घ्या! गुगल प्ले स्टोअरमध्ये होणार ‘हे’…

फँड्रीतील शालूच्या ‘या’ लूकने चाहते घायाळ, पाहा…

रणधीर कपूर यांनी चुकून शेअर केला करिनाच्या दुसऱ्या मुलाचा…

सोनं ‘इतक्या’ रुपयांनी महागलं, जाणून घ्या काय…