Uncategorized

महापालिकेचा निष्काळजीपणा; अडीच वर्षाचा चिमुरडा गटारात वाहून गेला

मुंबई : मुंबई महापालिकेचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. गोरेगावमध्ये उघड्या गटारात अडीच वर्षाचा मुलगा पडला आणि वाहून गेला आहे. अग्निशमन दलाकडून त्याचा शोध सुरु आहे.

माझा मुलगा 24 तासात सापडला नाही तर मी फाशी घेणार आहे. प्रशासनाच्या नावे पत्र लिहून मी फाशी घेणार, असा दिव्यांशच्या वडिलांनी पालिकेला इशारा दिला आहे.

महापालिकेच्या गटार उघडी ठेवल्याने चिमुरडा दिव्यांश सिंग वाहून गेल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पालिकेच्या या कामगिरीवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

दिव्यांश त्याच्या आईसोबत दुकानात गेला होता. रस्त्यावर खेळता खेळता तो उघड्या गटारात पडला आणि वाहून गेला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

दरम्यान, परिसारातील नाले आणि अनेक मॅनहोल जागोजागी उघडे करुन ठेवले आहेत. पालिकेने या घटनेकडे दुर्लक्ष केलं आहे. 12 तास उलटूनही दिव्यांशचा शोध लागला नाही. त्यामुळे परिसरातील लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

IMPIMP