काय सांगता! बिस्किटांची चव ओळखण्यासाठी ‘ही’ कंपनी देतेय तब्बल 40 लाख रुपये

नवी दिल्ली | कोरोनाच्या संकटामुळे अनेक क्षेत्रात मोठी उलथापालथ झाली. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या. त्यातच काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कायमची सुट्टी दिली. मात्र, एक बिस्कीट कंपनी तुम्हाला फक्त बिस्कीट खाऊन त्याची चव ओळखण्याचे वेतन देणार आहे. हो, तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे.

स्कॉटलँडमधील बिस्कीट बनवणारी ‘बॉर्डर बिस्किट्स’ असं त्या कंपनीचे नाव आहे. या कंपनीने नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. पण यात कंपनीने एक अट ठेवली आहे.

कंपनीने ठेवलेल्या अटीमुळेही अनेकजण त्याकडे आकर्षित होत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ते ‘मास्टर बिस्किटर’च्या शोधात आहोत. द इंडिपेंडेटच्या एका अहवालानुसार कंपनीमध्ये मास्टर बिस्किटरचे विविध पद आहे.

या पदांसाठी कंपनीला असे अर्जदार हवे जे बिस्कीटाची चव ओळखतील. अर्जदाराला स्वाद आणि बिस्कीट कसे बनवतात, याची माहिती हवी. याचबरोबर त्यांच्याकडे संवाद आणि नेतृत्व करण्याची क्षमता हवी.

बॉर्डर बिस्किट्स या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पॉल पार्किन्स यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, बिस्कीट उद्योगात आवड असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. आम्ही मास्टर बिस्किटरच्या ज्ञानासोबतच असे बिस्कीट बनवू इच्छितो जे प्रत्येकाला आवडेल. याव्यतिरिक्त बॉर्डर बिस्किट्सच्या ब्रँड प्रमुख सुजी कार्लाव्ह म्हणाल्या की, कंपनी ग्राहकांना सर्वोत्तम स्वाद आणि त्याचबरोबर उत्तम गुणवत्तेचे बिस्कीट देण्यास कटिबद्ध आहे. आम्ही या कामासाठी मास्टर बिस्किटरच्या शोधात आहोत.

आता वेतनाचे बोलायचे झाले तर मास्टर बिस्किटर या पदासाठी ४० हजार पाउंड म्हणजेच तब्बल 40 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज असेल. यात अजून एक मनोरंजक गोष्ट अशी आहे की, वर्षामध्ये 35 दिवस सुट्टीही मिळणार आहे. ही पूर्णवेळ नोकरी असेल, असंही पॉल पर्किन्स यांनी म्हटलं आहे.

बॉर्डर बिस्किट्स कंपनीने त्यांच्या इन्स्टाग्रामच्या पानावर आपल्या वस्तूंविषयी नेहमी माहिती देत असतात. इन्स्टाग्रामवरील वापरकर्तेही यात रस दाखवतात. एका अहवालात कंपनी म्हणते की, आम्ही देशभरातील लोकांना अर्ज करण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत, यामुळे आम्हाला प्रतिभावान व्यक्तींची मुलाखत घेण्यास उत्सुक आहोत.

महत्त्वाच्या बातम्या-

माणसातील माणुसकी ओळखण्यासाठी ‘या’ 9 गोष्टी ठरतील खूप उपयुक्त! नक्की वाचा

‘…तर मी एका मिनिटात राजकारण सोडेल’; राष्ट्रवादी प्रवेशापूर्वीच खडसेंच्या राजकारण सोडण्याच्या वक्तव्यानं समर्थक हैराण!

महेंद्रसिंग धोनीनं स्वतःच्याच नकळत आयपीएलमध्ये रचला नवीन विक्रम!

अखेर एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यानं दिली माहिती

भाजपला मोठा धक्का! पक्षांतरापूर्वीच खडसेंनी मोदींविरुध्द टाकलं पहिलं पाऊल