खेळ

भारताचं मालिका विजयाचं लक्ष; आज तिसरी अंतिम लढत

पोर्ट ऑफ स्पेन :  भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आज तिसरा आणि एकदिवसीय सामना रंगणार आहे. या लढतीसह मालिका विजयाचे भारताचे लक्ष असेल तर विंडीजचा मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न असेल. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसरा सामना भारताने जिंकला. अंतिम सामन्यात भारताच्या सलामीवर शिखर धवनवर पुर्णपणे दडपण असणार आहे. सलग चार लढतीत तो अपयशी ठरल्याने धवनला त्याची कामगिरी उंचावण्याचं आव्हान असेल. विंडीजविरूद्धच्या कसोटी संघात धवनला खेळता येणार नसल्याने तो मोठी खेळी करून दौऱ्याचा शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात असेल.

भारतीय संघातील चौथ्या क्रमांकासाठी जोरात स्पर्धा चालू आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने खूप बदल करून पााहिले यामध्ये विजय शंकर, केदार जाधव, अम्बाती रायडू, आणि रिषभ पंत यांना संधी देण्यात आली. पंतला संघ व्यवस्थापनाचा आणि कर्णधार विराट कोहलीचा पाठिंबा आहे.

दुसऱ्या वनडेमध्ये अय्यरने केलेली 68 चेंडूत 71 धावांची खेळी यामुळे परिस्थितीत बदल झाला. पंतची मानसिकता हा चिंतेचा विषय आहे. त्याने महत्त्वाच्या प्रसंगी आपली विकेट गमावली आहे. संघात या महत्त्वाच्या स्थानासाठी धैर्यवान फलंदाज असणं गरजेचं आहे.

विश्वचषक स्पर्धेतही चौथ्या स्थानाचा मुद्दा ऐरणीवर होता. अय्यर चौथ्या क्रमांकाला न्याय देऊ शकेल. त्यामुळे पंतने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी, अशी सूचना महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी केली आहे. रविवारच्या खेळीनंतर अय्यर याने आपला दावा मजबूत केला.

दुसऱ्या वनडेत 125  चेंडूत 120 धावा कोहलाने करत आपले 42 वे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतक पुर्ण केले. धवन, पंत आणि रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर कोहलीने अय्यरसोबत डाव सावरला. भुवनेश्वर कुमारने गेल्या सामन्यात आठ षटकांत 31 धावा देत चार गडी बाद केले. शमी याने दोन तर कुलदीप याने देखील दोन गडी बाद केले. आज मोहम्मद शमीच्या जागी आज सैनीला संधी मिळण्यायाची शक्यता आहे.

भारताला पराभूत करण्यासाठी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी अधिक जबाबदारी घेणे गरजेचे आहे. संघाकडे शाई होप, शिमरोन हेटमायर आणि निकोलस पुरन यांच्यासारखे प्रतिभावान फलंदाज आहे. त्यांनी आशेनुसार खेळ करायला हवा.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.

वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, एव्हिन लेविस, शाय होप, शिम्रॉन हेटमायर, निकोलस पूरन, रोस्टन चेस, फॅबियान ऑलीन, कालोर्सस ब्रेथवेट, कीमो पॉल, शेल्डर कॉट्रेल, ओशाने थॉमस, केमार रोच.

महत्वाच्या बातम्या-

-नारायण राणेंचा मनसेच्या आंदोलनाला पाठिंबा???

-मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 21 ऑगस्टपासून सुरु होणार

-स्वातंत्र्यदिनी वीरपुत्राचा ‘वीरचक्र’ने होणार सन्मान

-राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे करणार पूरस्थितीची पाहणी

-डोनाल्ड ट्रम्प काश्मीर मुद्द्यावरुन मध्यस्थी करणार नाहीत!

IMPIMP