नवी दिल्ली | कोरोना महामारीनं गेल्या दी़ड वर्षात मोठ्या प्रमाणात अनेक क्षेत्रांमध्ये नुकसान केलं आहे. अनेकांचे परिवार या काळात उद्धवस्त झाले आहेत.
कोरोनानं लहान बालकांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वांना आपल्या कार्यक्षेत्रात ओढलं आहे. अशा काळात सर्वात जास्त काळजी ही लहान बालकांची घेण्यात येते.
लहान बालकांना काही बोलता येत नाही परिणामी त्यांना होणारा जो त्रास आहे तो लवकर समजत पण नाही. अशा परिस्थितीत ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांनी अधिक प्रमाणात काळजी घेणं गरजेचं आहे.
कोरोनाच्या दोन लाटांमुळे अनेकांचे मोठं नुकसान झालं आहे. सध्या सर्वजण तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर उभे आहेत. अशा परिस्थितीत दिल्लीतील एक घटना सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
दिल्लीतील एका खाजगी दवाखान्यात एक महिन्याच्या एका लहान बालकानं कोरोनाचा मुकाबला यशस्वीपणे केला आहे. एका महिन्याच्या या बालकाचे प्राण वाचले आहेत.
दिल्लीतील ही घटना सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. कारण एका वर्षाच्या लहान मुलाचा जीव वाचल्याचं सर्वांनी पाहिलं होतं, पण आता ही बातमी चक्क एका महिन्याच्या बालकाची आहे.
दिल्ली येथील मुलचंद या खाजगी दवाखान्यात हा आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. लहान मुलगा सतत रडत असल्यामुळं त्याला पालकांनी दवाखान्यात दाखल केलं होतं.
दवाखान्यातील डाॅक्टरांनी त्याची तब्येत चेक केली तर कोरोना चाचणी पाॅझिटीव्ह आली. सर्वांची चिंता वाढली होती पण त्या बालकाला निट करण्यात सर्वांना यश आलं आहे.
दरम्यान, एका महिन्याच्या बालकाला कोरोनापासून वाचवता आल्यानं मुलचंद दवाखान्यातील सर्वजण त्या बालकाला सुट्टी देताना भावूक झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
ठरलं तर! योगी अयोध्येतून नाही तर ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार
“…तर शक्यता नाकारता येत नाही”; लाॅकडाऊनबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य
‘मराठी इंडस्ट्रीत दबाव तंत्र सुरु आहे’; अभिनेता किरण माने प्रकरणावर मलिकांची प्रतिक्रिया
महत्त्वाची बातमी! कोरोनामुळे बंद असलेल्या ‘या’ गाड्या पुन्हा रेल्वे ट्रॅकवर धावणार
‘नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही’; भाजपचा हल्लाबोल