‘जेलवारीसाठी तयार राहा’, भाजप नेत्याच्या इशाऱ्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ

मुंबई | पैशांची अफरातफर प्रकरणात राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) हे सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्यावर अनेक आरोप असून सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) न्यायालयात त्यांच्यावर याचिका सुरु आहेत.

आता त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे एक नवे नेते देखील गजाआड जाण्याची शक्यता आहे. भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी त्याबाबत भविष्यवाणी केली आहे. त्यांनी त्यासंदर्भात ट्विट केले आहे.

त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचा पुढील नेता कोण, याची नागरिकांनी उत्सुक्ता लागली आहे. तर दुसरीकडे कंबोज यांना हे अगोदरच कसे काय माहित झाले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सक्तवसुली संचलनालय हे भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहे का? मोहित कंबोज हा ईडीचा अधिकारी आहे का, असे प्रश्न विरोधी पक्ष विचारत आहेत. कंबोज यांच्या ट्विटने आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मोठी खळबळ उडवून दिली आहे.

राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांची सध्या ईडी चौकशी करत आहेत. खुद्द शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना संचलनालयाची नोटीस आली आहे. तर राष्ट्रवादीचे आणखी एक नेते प्रफुल्ल पटेल यांची देखील सीजे हाऊस प्रकरणात चौकशी सुरु आहे.

त्यामुळे मोहित कंबोज ज्यांचे नाव सुचवू पाहत आहेत, ते मोठे नेते प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) तर नाहीत ना, अशी चर्चा सध्या रंगली आहे. सध्या कंबोज हे भाजपमधील मोठे नेते आहेत. त्यांचे सध्या पक्षात वजन आहे.

आज विधानसभा पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session) पहिला दिवस आहे. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर तु़टून पडण्याची शक्यता आहे. तसेच आज मोहित कंबोज यांच्या ट्विटवर देखील वाद होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या – 

हाच तुमचा अमृतमहोत्सव आहे का? असादुद्दीन ओवेसींचे केंद्र सरकारवर आरोप

“बायको जेवढी फूगत नसेल तेवढे…” – सुप्रिया सुळे

“सत्ता आली म्हणजे काय मस्ती आली का तुम्हाला?” अजित पवारांची आक्रमक पत्रकार परिषद, वाचा सविस्तर

देवेद्र फडणवीसांचा आघाडी सरकारवर गंभीर आरोप

‘जन गण मन’ ऐवजी आता ‘या’ गीताला राष्ट्रगीत म्हणून घोषित करा – हिंदू महासंघ