OnePlus चाहत्यांसाठी खुशखबर; पहिल्याच दिवशी मिळवा ‘इतक्या’ हजारांचा बंपर डिस्काऊंट

मुंबई | कोरोनाचे निर्बंध मागे घेण्यास सुरूवात झाल्यानंतर आता बाजारात तेजी पहायला मिळत आहे. मोबाईल कंपन्या आता आपापल्या नवीन कल्पकता दाखवत आहेत.

भारतीय बाजारात अल्पावधित लोकप्रिय झालेल्या OnePlus मोबाईलचा नवीन फोन बाजारात येत आहे. नवीन फिचर्सचा समावेश असलेला हा फोन कंपनी बाजारात आणत आहे.

वन प्लस 9 प्रो आणि वन प्लस 10 प्रो नवीन तंत्रज्ञानासह उपलब्ध आहे. आकर्षक डिझाईन, जबरदस्त बॅट्री बॅकअपसह मोबाईल उपलब्ध आहेत.

नवीन वर्षात मोबाईल खरेदीचा विचार करत असाल तर वन प्लस मोबाईल चांगला पर्याय ठरू शकतो. अमेझाॅन मोबाईल अॅप आणि पाॅप अप स्टोअर्समध्येही मोबाईल उपलब्ध असणार आहे.

एसबीआय क्रेडिट कार्ड असेल तर 4500 रूपये डिस्काऊंट मिळणार आहे. जुना स्मार्ट फोन असेल तर तो एक्सचेंज केला तर तुम्हाला 5000 रूपये मिळणार आहेत.

जुना वन प्लस स्मार्टफोन असेल तर 2 हजार रूपये सुट असणार आहे. वन प्लस 10 प्रो दोन व्हेरियंटमध्ये लाॅंच झाला आहे. 8 जीबी प्लस 12 जीबीची किंमत 66 हजार 999 रूपये आहे. तर दुसऱ्या व्हेरियंटची 71 हजार 999 रूपये असणार आहे.

दरम्यान, 6.7 इंची डिस्प्ले, इन डिस्प्ले फिंगर प्रिंट, डाॅल्बी एटमाॅस सपोर्टसह ड्युअल स्टीरिओ स्पिकर हे या फोनची वैशिष्ट्ये आहेत. परिणामी हा फोन सर्वांच्या पसंतीस उतरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 Sanjay Raut: “आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो”; संजय राऊत कडाडले

 ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

  “पैसे जपून खर्च करा, चिकन खरेदी करायला गेलात तरी भाजप ईडीला कळवेल”

  लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती आली समोर, रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

  राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज