OnePlus 13 Smartphone l OnePlus कंपनीची गणना भारतातील टॉप कंपन्यांमध्ये केली जाते. कंपनीने अलीकडेच प्रीमियम मालिका OnePlus 12 आपल्या ग्राहकांसाठी सादर केली आहे, ज्यात OnePlus 12 आणि OnePlus 12R चा समावेश आहे. OnePlus 12 स्मार्टफोन भारतात जानेवारीमध्ये Qualcomm च्या Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह लॉन्च करण्यात आला होता.
या मालिकेच्या अवघ्या दोन महिन्यांत OnePlus 13 बाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. या हँडसेटचे प्रारंभिक रेंडर ऑनलाइन लीक झाले आहे, जे त्याचे डिझाइन घटक दर्शवित आहे. या नवीन सेगमेंटमध्ये तुम्हाला कॅमेऱ्यात विशेष बदल पाहायला मिळणार आहेत.
OnePlus 13 Smartphone l OnePlus 13 मध्ये काय खास असणार :
OnePlus 13 Smartphone l ऑनलाइन आलेल्या माहितीनुसार कंपनी खास स्वरूपाचा कॅमेरा सादर करणार आहे. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा असल्याची माहितीही समोर आली आहे. OnePlus 12 मध्ये तुम्हाला एक गोलाकार कॅमेरा मॉड्यूल मिळेल. याचा अर्थ असा की नवीन डिझाइनसह, OnePlus 13 मध्ये एक महत्त्वपूर्ण बदल दिसून येत आहे. हा आगामी फोन स्नॅपड्रॅगन 8 Gen 4 प्रोसेसरसह लाँच होऊ शकतो, जो Qualcomm चा पुढील पिढीचा चिपसेट असू शकतो.
OnePlus 13 स्मार्टफोन या रांगांमध्ये सादर होणार? :
OnePlus Club ने X वर OnePlus 13 चे रेंडर शेअर केले आहेत. या रेंडरमध्ये, हॅसलब्लॅड-ब्रँडेड ट्रिपल कॅमेरा सेटअपसह हँडसेट पांढऱ्या रंगात दाखवला आहे. याशिवाय हा स्मार्टफोन पुढील पिढीचा OnePlus 2K रिझोल्यूशन डिस्प्लेसह येऊ शकतो. तसेच OnePlus 13 हा स्मार्टफोन टेलिफोटो सेन्सरसह 50MP मुख्य कॅमेऱ्यासह सादर होऊ शकतो.
News Title : oneplus 13 smartphone features l
महत्त्वाच्या बातम्या-
रेल्वेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न होणार साकार! तब्बल 9 हजार पदांसाठी बंपर भरती सुरु
आजपासून सलग 3 दिवस बँका आणि शेअर बाजार बंद राहणार! पाहा मार्च महिन्यातील सुट्ट्यांची यादी
भगवान महादेवाला प्रिय आहेत या वनस्पती; भोलेनाथ होईल प्रसन्न
केंद्र सरकारने महिलांना दिली खास भेट! गॅस सिलिंडर तब्बल ‘एवढ्या’ रुपयांनी केला स्वस्त
आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींवर भोलेनाथ प्रसन्न होणार; मिळणार आनंदाची बातमी