मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) सध्या राजकराणात सक्रिय झाले आहेत. सध्या त्यांचे दौरे सुरु असून अगामी महानगरपालिका (Municipal Corporation Election) आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी त्यांची मोर्चेबाधणी सुरु आहे.
अमित ठाकरे सध्या कार्यकर्ते आणि नागरिकांसोबत संवाद साधत आहेत. त्यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकारणात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यानंतर ठाकरे घराण्यातील आणखी एक चेहरा राजकारणात आला आहे.
एका सभेत त्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक भाष्य केले आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणूका आपल्याला जिंकायच्या आहेत. त्यामुळे कोणत्याही निवडणूका असल्यास मला बोलवा, असे ते म्हणाले.
येणारी प्रत्येक निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची आहे. त्यासाठी आपल्याल सक्षम उमेदवार द्यायचा आहे. आणि त्याच्या विजयासाठी भरपूर प्रयत्न करायचे आहेत. त्या निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी मी तयार आहे, असे ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान, शिवसेना नेते आणि मविआचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील सध्या शिवसंवाद यात्रेनिमित्त महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे यांनी आपल्या भाषणात आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
शिवसेनेत बंड होण्याच्या कित्येक काळ आधी मी माझे दौरे सुरु केले आहेत. पण आदित्य ठाकरे यांना माझा असा प्रश्न आहे की, जर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले नसते, तर तुम्ही दौरा सुुरु केला असता का? एवढाच माझा प्रश्न असल्याचे अमित ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! शरद पवारांपाठोपाठ अजित पवारांनाही धक्का
शिंदेंच्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी!
“मुख्यमंत्री अनेक दिवस नीट झोपलेले नाहीत, ते रात्री…”
गोपीचंद पडळकरांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, उचललं मोठं पाऊल
“राहुल गांधी म्हणजे एक पार्ट टाइम राजनेते”