मोदी सरकारविरोधात काँग्रेसचं भारत बचाओ आंदोलन!

नवी दिल्ली | काँग्रेस पक्षाने मोदी सरकारला घेरण्यासाठी आज भारत बचाव आंदोलनाचं आयोजन केलं आहे. हे आंदोलन नवी दिल्लीतील रामलीला मैदानात होणार आहे. या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित झाले आहे.

आर्थिक मंदी, शेतकरी विरोधी भूमिका, महिला अत्यााचार, बेरोजगारी आणि संविधानावर केलेले हल्ले या मुद्द्यांवर काँग्रेस मोदी सरकारला घेरणार आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधीही या आंदोलनाला उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे.

भारत बचाओ आंदोलन ऐतिहासिक असेल, असा दावा काँग्रेसने केला आहे. मोदी सरकार खऱ्या मुद्द्यांवरुन देशाचं लक्ष विचलीत करत आहेत. पण आम्ही या सर्व मुद्द्यांवरुन आंदोलन करत जनतेच्या संपर्कात जाणार आहोत, असंही काँग्रेसने सांगितलं आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या भारत बचाओ आंदोलनासाठी उत्तर प्रदेशमधून 40 हजार पेक्षा अधिक कार्यकर्ते दिल्लीत आले आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या-