…म्हणून ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यास दर दिवशी शंभर रुपये मिळणार!

मुंबई | तुम्ही ऑनलाईन व्यवहार करताना तो अयशस्वी झाला आणि ग्राहकाला एक दिवसाच्या आत त्या व्यवहाराचे पैसे परत नाही मिळाले तर दर दिवशी 100 रूपये मिळणार आहेत. रिझर्व बँकेने या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे.

तुम्ही ऑनलाईन पेमेंट करत असाल आणि ते अशस्वी झालं तर काळजी करू नका. जो पर्यंत रिफंडचे पैसे परत मिळत नाहीत तो पर्यंत दर दिवशी 100 रूपये तुमच्या खात्यात जमा होतील.

UPI, IMPS, NACH द्वारे पेमेंट केल्यास हा नियम लागू होणार आहे. 15 ऑक्टोबर 2019 पासून हा नियम होणार आहे.

रिझर्व बँकेने ‘टर्न अराऊंड टाईम’च्या नियमात बदल करत हा नवा नियम लागू केला आहे. या बदललेल्या नियमानुसार बँक ग्राहकांना फेल ट्रान्झ‌ॅक्शनच्या पैशांसाठी जास्त दिवस वाट पहावी लागणार आहे. 

दरम्यान, ग्राहकांना या बदललेल्या नियमाचा लाभ न मिळाल्यास रिझर्व बँकेकडे तक्रार करता येईल. 

महत्वाच्या बातम्या-