Top news महाराष्ट्र मुंबई

…म्हणून फक्त परप्रांतीयांनाच मुंबई आणि पुण्यातून जाता येणार

मुंबई |  मुंबई आणि पुणे ही दोन शहरं कोरोनाचा हॉटस्पॉट बनली आहेत. प्रत्येक दिवसागणिक कोरोनाबाधित रूग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत मुंबई पुण्यातला वाढता धोका लक्षात घेता प्रशासनाने प्रवासासंबंधीचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआर) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील (पीएमआर) नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात किंवा अन्य जिल्ह्यातून या क्षेत्रात येण्याची परवानगी मिळणार नाही.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआर) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात अडकलेल्या परप्रांतातील मजुरांनाच महाराष्ट्राबाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल, असा खुलासा राज्य सरकारने केला आहे.

लॉकडाऊनमुळे पुण्यात आणि मुंबईत अडकलेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या नागरिकांना आपल्या घराकडे जाण्याचे वेध लागले होते. मात्र शासनाच्या नव्या निर्णयाने आता संबंधितांना वेटिंग करण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-योग्य वेळी राज्यातील जनता मला पुन्हा सत्तेत आणेलच; देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

-“त्या फॉर्ममुळे गावात भांडणे सुरु झाली आहेत, सरकारने एकदाच काय ते धोरण निश्चित करावं”

-आम्ही स्वबळावर लढलो असतो तरी आम्ही 144 चा आकडा गाठला असता- देवेंद्र फडणवीस

-कोरोनाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले; 24 तासात वाढले ‘एवढे’ रुग्ण

-निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादी, शिवसेनेचं सगळं ठरलं होतं- देवेंद्र फडणवीस