ओप्पोनं भारतीय स्मार्टफोनच्या बाजारात आपला आणखी एक नवाकोरा स्मार्टफोन लाँच केला आहे. ओप्पो F9 Pro असं या स्मार्टफोनचं नाव आहे.
Oppo F9 Pro चे स्पेसिफिकेशन्स-
ओप्पो एफ9 प्रोमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे. 6.3 इंच फुल एचडी+डिस्प्ले आहे. रेजॉलूशन 1080×2280 पिक्सल आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशो 19:5:9 आहे. डिस्प्लेच्या सुरक्षिततेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास दिली आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो पी60 प्रोसेसर आहे. फोन ऐंड्रॉयड 8.1 ओरियो वर चालतो.
6 जीबी रॅम, इनबिल्ट स्टोरेज 64 जीबी, फोन स्टोरेज 256 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकतं. ड्यूल-सिम, फिंगरप्रिंट सेंसर… एलईडी फ्लैश, अपर्चर एफ/1.8 सोबत 16 मेगापिक्सल प्राइमरी आणि अपर्चर एफ/2.0 सोबत 2 मेगापिक्सल सेकंडरी कॅमेरा देण्यात आलाय. तसेच 25 मेगापिक्सल वाला सेल्फी कॅमरा देण्यात आलाय.
Oppo F9 Pro ची किंमत व ऑफर्स-
Oppo F9 Pro सनराइज़ रेड, ट्विलाइट ब्लू आणि स्टारी पर्पल कलरमध्ये उपलब्ध आहे. 6 जीबी रॅम वेरियंटची किंमत 23,990 रुपये आहे. 31 ऑगस्टपासून या फोनची विक्री सुरु होणार आहे. मंगळवारपासून प्री-बुकिंग सुरु होईल. फोन फ्लिपकार्ट, पेटीएम आणि अॅमेझॉन इंडिया सोबतच देशभरातील ऑफलाइन रिटेल स्टोरवर विकत घेता येईल. प्री-ऑर्डर केली तर जियो ऑफर सोबत वन टाइम स्क्रीन रीप्लेसमेंट मिळेल.