“मंदिरं उघडण्याच्या प्रश्नी घंटानाद आंदोलन करत विरोधकांनी सोशल डिस्टन्सिंगची काशी केली”

मुंबई | कोरोनाकाळात राज्यात चांगलंच राजकीय नाट्य रंगलं आहे. विरोधी पक्ष आणि सरकार यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या खेळी चालूच आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरातील मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, मंदिरं लवकरात लवकर खुली करण्यात यावी यासाठी भाजपकडून राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. याच आंदोलनाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनाच्या अग्रलेखामधून भाजपवर निशाणा साधण्यात आलेला आहे.

कोरोनाकाळात घंटनाद आंदोलनासाठी राज्यातील लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येत आहेत. लोकांना मनःशांती आणि पोटशांती हे दोन्ही मंदिराच्या माध्यमातून मिळायला हवी पण पुन्हा कोरोनाचा ब्लास्ट झालाच तर याची जबाबदारी विरोधी पक्ष घेणार आहे काय?, असा सवाल भाजपला सामनामधून विचारण्यात आला आहे.

मंदिरं उघडल्यानंतर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ राबवायचे हे लोकांना कळतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. पण भाजपतर्फे जे घंटानाद आंदोलन झालं त्याची छायाचित्र पाहिल्यावर समजलं या डिस्टन्सिंगची कशी काशी झाली आहे ते, अशा खरमरीत शब्दात शिवसेनेनं भाजपवर टीका केली आहे.

मंदिरं उघडण्याच्या प्रश्नी विरोधकांनी धसमुसळेपणा करण्याआधी महाराष्ट्राची स्थिती समजून घेतली पाहिजे. ज्या मनःशांतीचा उद्घोष राज्याचे विरोधी पक्षनेते करतात त्यांनी मनःशांतीचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. मंदिराची टाळी उघडायला हवीत पण राजकीय मनःशांतीसाठी नको. आधी लोकांना जगवा मग पुढचं पुढं, असंही सामनामधून सांगण्यात आलं आहे.

औरंगाबादचे एमआयएमचे खासदार जलील मियानी यांनी 2 सप्टेंबर नंतर मशिदीची टाळी उघडण्याची घोषणा केली आहे. जलील यांनी मशिदी उघडण्याची बाग दिली म्हणून भाजपच्या पुढाऱ्यांनी राज्याच्या आरोग्याचा विचार न करता घंटा वाजवणं बरं नाही, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, घंटानाद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्वीटरवरून भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. सत्तेचं दार बंद झाल्यानं भाजपचा घंटनाद असं म्हणत चाकणकर यानी भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं.

महत्वाच्या बातम्या

‘राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा जातीय दाखला बोगस’, शिवसेना नेत्याचा आरोप

सीबीआयनं सुशांत संबंधित ‘तो’ खासगी प्रश्न विचारताच रियाचा चढला पारा; म्हणाली…

मला मुंबई पोलिसांची भीती वाटते, सुरक्षा द्यायची असेल तर केंद्राने किंवा ‘या’ राज्याने द्यावी- कंगणा

‘हे’ औषध कोरोनाच्या उपचारासाठी आहे अत्यंत प्रभावी’; पुण्याच्या डॉक्टरांनी केलाय दावा!

सत्यजित तांबेंनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काकूंची तुलना केली थेट अर्थमंत्र्यांशी!