मुंबई | आज राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष आज होणाऱ्या अधिवेशनावर लागलं आहे.
विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची संपूर्ण रणनिती आखल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे यावर्षीच्या अधिवेशनात काय काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बऱ्याच काळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिनवेशनाला उपस्थित झाले आहेत. मागच्या वेळी प्रकृतीमुळे उद्धव ठाकरे यांना अधिवेशनाला उपस्थित राहता आलं नाही.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिकांच्या राजीमान्यावरुन विरोधक आक्रमक झालेले पहायला मिळालं.
शिवाजी महारांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या अभिभाषणाच्या वेळी विरोधक आक्रमक झाले आहेत.
अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप नेत्यांनी नवाब मलिक हाय हाय घोषणाबाजी पहायला मिळाली.
नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरुन आता विरोधकांनी घोषणाबाजी करत वातावरण पेटवलं आहे. दाऊदच्या दलाल मंत्र्यांचा राजीनामा घ्या, अशा घोषणा विरोधकांनी यावेळी दिल्या.
आता ठाकरे सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“भाजपकडून फक्त हूल दिली जाते, त्याला वादळ नाही आदळआपट म्हणतात”
सर्वात मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का
“सापाच्या पिलाला आम्ही 30 वर्षे दूध पाजले, ते पिल्लू आता आमच्यावरच फुत्कारतंय”
आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक सज्ज
“सरकार पडणार, सरकार पडणार, माझे 170 मोहरे फोडून दाखवाच”