अयोध्येत राम मंदिराचं काम सुरु; आता पाकिस्तानात सुरु झाली कृष्ण मंदिर बांधण्याची मागणी

 इस्लामाबाद | आज राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजन करण्यात आलं. आज देशाच्या कानाकोपऱ्यातून सर्वांनी आनंद व्यक्त केला. मात्र दुसरीकडे आपला शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानमध्ये विरोधकांनी वेगळीच मागणी लावून धरली आहे.

इम्रान खान सरकारने तात्काळ पावलं उचलावी आणि राजधानी इस्लामाबादमध्ये मंदिर उभारणीत जे अडथळे येत आहेत ते दूर करावे. येथे मंदिर उभारणी करून पाकिस्तान सर्व धर्मियांचा आदर करतो हे जगाला दाखवून देऊ, असं पीपीपीचे खासदार मुस्तफा नवाज खोखर यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढत मोदींना उत्तर म्हणून ही मागणी केली आहे.

मोदी अयोध्येत राम मंदिर बनवत असून याला जशास तसे उत्तर देण्यासाठी इम्रान यांनी इस्लामाबादमध्ये श्रीकृष्ण मंदिर उभारावं, अशी मागणी  पीपीपी पक्षाच्या प्रवक्त्याने केली आहे. त्यामुळे पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, इस्लामाबादमध्ये श्रीकृष्ण मंदिर उभारण्याचा प्रस्ताव इम्रान सरकारने मान्य केला होता आणि जमीनही दिली होती. दोन महिन्यांपूर्वी या कामास सुरुवात झाली. मात्र कट्टरपंथी लोकांनी या मंदिराचे बांधकाम उखडून टाकले. पाकिस्तान मुस्लिम राष्ट्र असून येथे आम्ही कर भरतो. आमच्या पैशातून मंदिर उभारू देणार नाही, असे कट्टरपंथी लोकांचं म्हणणं आहे.

महत्वाच्या बातम्याा-

सुनेला भूतबाधा झाल्याच्या संशयावरून सासरच्या माणसांनी तिच्यासोबत केलं असं काही की…

रक्षाबंधन दिवशी बहिणींनी ओवाळले अन् भावाने ओवाळणीत दिले आपले प्राण

माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांबद्दल पोलिसानेच काढले अपशब्द अन् मग…

अमृताजी, पोलीस बांधव तेच आहेत बदललीय ती फक्त तुमची दृष्टी; चाकणकरांचा निशाणा

शिवसेना राम जन्मभूमीत थाटामाटात कार्यक्रम करणार; भूमिपूजनानंतर संजय राऊत गरजले