महाराष्ट्र मुंबई

सरकार पाडण्यात आम्हाला काहीही रस नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई | राजभवनात राज्यपालांच्या भेटीसाठी दिग्गज नेत्यांच्या फेऱ्या वाढल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद बोलावली.

सध्या लढाई कोरोनाविरूद्ध आहे. सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. सध्या कोरोनाच्या लढाईतून लक्ष विचलित करण्यासाठी, माध्यमांचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी अशा बातम्या दिल्या जात आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारनं 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. केंद्राकडून विविध मार्गांनी राज्याला मदत मिळाली. पण केंद्र सरकार मदतच करत नसल्याचा, महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातो. एकच आरोप वारंवार केल्यानंतर तो खरा वाटू लागतो. मात्र केंद्राकडून इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला जास्तच मिळालं आहे, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, पीपीई किट, N-95 मास्क यांचाही पुरवठाही केंद्राने केला आहे. तसेच आत्तापर्यंत 28 हजार 104 कोटींचा निधी केंद्राने राज्य सरकारला उपलब्ध करुन दिला आहे. तरीही केंद्राने काहीही दिलं नाही असं वारंवार सांगितलं जात आहे, असं फडणवीस म्हणााले  आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-केंद्राने ठाकरे सरकारला आत्तापर्यंत ‘इतक्या’ हजार कोटींची मदत केली- देवेंद्र फडणवीस

-…म्हणून काॅंग्रेसनं सत्तेतून बाहेर पडावं; ज्येष्ठ काॅंग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ

-भाजपमध्ये वरिष्ठ नेते असतील, पण मी… नारायण राणेंनी भाजप नेत्यांना सुनावलं

-राज ठाकरेंचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पत्र; केली ‘ही’ मागणी

-महाराष्ट्रात आमचा सरकारला पाठिंबा, पण…- राहुल गांधी