मुंबई | नवनिर्वाचीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या मंत्रिमंडळाचे आज (दि. 17) पहिले अधिवेशन आहे. आज त्यांच्यात आणि विरोधी पक्षात मोठे शाब्दिक युद्ध सुरु होणार आहे.
त्तपूर्वी विधानभवन परिसर विरोधी पक्षाच्या आंदोलनाने गाजला. यावेळी महाविकास आघाडीचे (MVA) अनेक नेते आणि कार्यकर्ते विधानभवन परिसरात उपस्थित होते. त्यांनी सरकार विरुद्ध घोषणा दिल्या.
‘आले रे आले, गद्दार आले’, ‘पन्नास खोके, एकदम ओके’ आणि ‘ईडी (ED) सरकार हाय हाय’ अशा घोषणा विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर दिल्या आणि एकच हशा पिकला होता.
यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) उपस्थित होते. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि इतर कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते.
विरोधकांनी ईडी (ED) सरकार हाय हाय, अशा घोषणा देखील दिल्या आणि नवीन सरकारचा निषेध केला. आता विधानसभेच्या अधिवेशनात देखील ते सरकारला धारेवर धरणार, यात शंका नाही.
महत्वाच्या बातम्या –
“शरद पोंक्षे आतंकवादी, नथुरामाची औलाद आहे”
‘जेलवारीसाठी तयार राहा’, भाजप नेत्याच्या इशाऱ्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ
हाच तुमचा अमृतमहोत्सव आहे का? असादुद्दीन ओवेसींचे केंद्र सरकारवर आरोप
“बायको जेवढी फूगत नसेल तेवढे…” – सुप्रिया सुळे
“सत्ता आली म्हणजे काय मस्ती आली का तुम्हाला?” अजित पवारांची आक्रमक पत्रकार परिषद, वाचा सविस्तर