महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात 25 हजार कंपन्या सुरु, 6 लाख जणांच्या हाताला काम- सुभाष देसाई

मुंबई | रेड झोन वगळता सध्या महाराष्ट्रात 57 हजार 745 उद्योगांना परवाने मिळाले असून 25 हजार कंपन्यांनी उत्पादन सुरु केलं आहे. त्यामुळे जवळपास साडेसहा लाख कामगारांच्या हाताला काम मिळालं आहे.

उद्योग विभागाने ठोस पावलं उचलल्याने उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येत आहे. राज्यात 25 हजार कंपन्या सुरु झाल्या असून त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख कामगार काम करत आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी मे अखेर महाराष्ट्र ग्रीन झोन करायचा संकल्प केला आहे. त्यामुळे तोपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे, आपली पहिली लढाई कोरोनासोबत आहेत. त्यामुळे थोडी घाई करु नये, असं आवाहन सुभाष देसाई यांनी केलं.

स्थिर वीज बिलाबाबत ऊर्जामंत्र्यांसोबत बैठक घेतली असून जेवढा विजेचा वापर होईल, तेवढेच बिल आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय कर्जाचे हप्ते फेडण्यासाठीदेखील सवलती जाहीर केल्या आहेत, असंही सुभाष देसाई यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-मुंबई उच्च न्यायालयाचा कुख्यात डॉन अरुण गवळीला दिलासा!

-रिलायन्स जिओनं ‘या’ पॉप्युलर पॅकमध्ये केला मोठा बदल; रोज मिळत होता 2 जीबी डेटा

-दोन घरं, एक फार्म हाऊस; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘इतक्या’ कोटींची संपत्ती?

-“कोरोनावरील लस अजून दोन वर्षे तरी अशक्य, लोकांनी परिस्थितीशी जुळवून घ्यावं”

-11 मे ते 17 मे पर्यंत ‘या’ परिसरात संपूर्ण लॉकडाऊन; पुणे मनपा प्रशासनाचा मोठा निर्णय