खळबळजनक! ऑर्केस्टा-डान्स बारमालकांचा मुंबई पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप

मुंबई | मुंबई पोलिसांवर बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून खंडणी उकळल्याचा आरोप होऊन एक वर्षही उलटले नाही आणि आता पोलिसांवर रेस्टॉरंट मालकांना त्रास देण्याचे आरोप होत आहेत.

मुंबईत असे अनेक बार मलिक आहेत ज्यांचा आरोप आहे की, पोलीस त्यांच्या बारमध्ये येतात, बसतात आणि काहीवेळा सोफ्यावर झोपतात, ज्यामुळे त्यांच्या ग्राहकांवर याचा परिणाम दिसून येत आहे.

जे पोलीस त्यांच्याकडे येतात आणि त्यांना त्रास देतात, आणि म्हणतात की, त्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हा आदेश दिला आहे. ज्याचे ते पालन करत आहे, असं बार मालकांनी सांगितलं.

मुंबईत एकूण 259 ऑर्केस्ट्रा आणि डान्स बार आहेत. बारमालकांनी याबाबत AHAR कडे तक्रार केली आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, आम्ही असा कोणताही आदेश दिलेला नाही किंवा आम्ही कोणतेही हॉटेल, रेट्रोरेंट, बार आणि ऑर्केस्ट्रा मुदतीपूर्वी बंद करण्यास सांगितले नाही.

आम्ही पोलिसांना कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करू नये असं सांगितलं आहे. आणि जर पोलिसांनी कोणत्याही व्यावसायिकाला त्रास दिला तर ते तक्रार करू शकतात ज्याची गंभीर दखल घेतली जाईल.

महत्त्वाच्या बातम्या-

 महाराष्ट्रातल्या ‘या’ जिल्ह्यात मिळतंय सर्वात महाग पेट्रोल!

राज ठाकरेंना धक्का?, हा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?

“…तर 2 लाख रूपये भरपाई मिळणार”, नितीन गडकरींनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात एकनाथ खडसेंना समन्स