कॉलेजची निवडणूक नंतर गर्लफ्रेंडची हत्या?, साधा सरळ कॉलेजचा मुलगा लॉरेंस बिश्नोई असा बनला गॅंगस्टर

मुंबई | पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची मानसा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यादरम्यान गोळीबारात दोन जण जखमीही झाले.

घटनास्थळावरून तीन एके-94 रायफलच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. लोकप्रिय पंजाबी गायक-राजकारणी सिद्धू मूसवाला यांच्या हत्येनंतर काही तासांनंतर, कॅनेडियन गँगस्टर गोल्डी ब्रार याने हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. या हत्येमध्ये लॉरेन्स बिश्नोईचे नावही समोर आलं.

सिद्धू मूसेवाला याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारत गोल्डी ब्रारने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिलं की, त्या हत्येमागे तो आणि लॉरेन्स बिश्नोई गटाचा हात होता. या लॉरेन्स बिश्नोईबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलीये.

लॉरेन्स बिश्नोईने चंदीगडच्या डीएव्ही स्कूलमधून बारावीचं शिक्षण घेतलं होतं. 2008 मध्ये सोपूने शाळेतील विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवली, ज्यामध्ये त्यांचा पराभव झाला.

विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई हे दुसऱ्या बाजूने शत्रू बनले, ज्याने त्यांचा निवडणुकीत पराभव केला. एकदा दोन्ही बाजू समोरासमोर आल्या आणि गोळीबार सुरू झाला. या घटनेने लॉरेन्सचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. समोरच्या बाजूच्या गाढ शत्रुत्वामुळे लॉरेन्सला आपलं प्रेम गमवावं लागलं, अशी माहिती समोर आलीये.

लॉरेन्सला ओळखणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की, विरुद्ध पक्षाने एका कटाचा भाग म्हणून लॉरेन्सच्या मैत्रिणीची हत्या केली होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मी जेलमध्ये राहूनही डिप्रेशनमध्ये गेलो नाही, तुम्हाला डिप्रेशन कसं येतं?” 

दहावीच्या निकालात मुलींची बाजी; 97.96 टक्के मुली उत्तीर्ण 

“राष्ट्रपती निवडणुकीसाठी मी काही डावपेच रचलेत, माझा अर्ज 100 टक्के जाणार”

“शरद पवारांशिवाय तगडा उमेदवार देशात उरलाय का?” 

महागाईने त्रस्त नागरिकांसाठी आनंदाची बातमी!