देशात लॉकडाऊन, मात्र मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामींच्या मुलाचा लग्नसोहळा थाटामाटात

बंगळुरु | देश कोरोनाच्या संकटाशी झुंजत असताना देशभरात अनेकांनी आपापले विवाह सोहळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. पण माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचा पुत्र असलेला अभिनेता निखिल थाटामाटात विवाहबंधनात अडकला आहे.

लग्नाच्या फोटोमध्येच सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा वाजल्याचेही चित्र दिसत आहे.  17 एप्रिलच्या मुहूर्तावर निखिलचं लग्न रेवतीसोबत करण्याचं आधीपासूनच ठरलं होतं. रेवती ही कर्नाटकचे माजी गृहनिर्माणमंत्री एम. कृष्णाप्पा यांची नात आहे.

आम्हाला धुमधडाक्यात लग्न करायचं होतं, तुम्हा सर्वांना आमंत्रण द्यायचं होतं. परंतु ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे आम्हाला ठरलेल्या दिवशीच छोटेखानी विवाह सोहळा आखणे भाग आहे, असं म्हणत कुमारस्वामी यांनी पाहुण्यांची माफी मागितली आहे.

बंगळुरु हे ‘कोरोना’च्या रेड झोनमध्ये येत असल्यामुळे ‘रामनगर’ या ग्रीन झोन शहरातल्या फार्म हाऊसवर लग्न पार पडलं. 12-13 डॉक्टरांसोबत बोलून लग्नसोहळा आयोजित केल्याचं कुमारस्वामी म्हणाले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

-MPSC EXAM: वयाची मुदत संपणाऱ्या परीक्षार्थींना 1 वर्ष वाढवून देण्याचा मंत्री उदय सामंतांचा शब्द

-“वाटलं होतं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर सर्वांना समान न्याय भेटेल पण…”

-“शिधावाटपाच काम विनातक्रार व्हावं यासाठी पालकमंत्र्यांनी जातीनं लक्ष घाला”

-“रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार द्या”

-म्हणून… ससूनच्या निवासी डाॅक्टरांनी दिला सामूहिक राजीनाम्याचा इशारा