‘मजुरांना विनामूल्य रेल्वेसेवा द्या’; रितेश देशमुखनं शेअर केला मन सुन्न करणारा फोटो

मुंबई | लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांना आपल्या घरी परतण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने नियमावली जारी केली आहे. मात्र, अडकलेल्या या मजूरांकडून घरी जाण्यासाठी प्रवास भाडे आकारण्यात येत असल्याची माहिती आहे. अशातच अभिनेता रितेश देशमुखने एक मन सुन्न करणारा फोटो ट्विटवर शेअर करत मजुरांना गावी जाण्यासाठी विनामूल्य रेल्वेसेवा दिली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

आपल्या वृद्ध आईला कमरेवर उचलून घेऊन एक मजूर पायी प्रवास करत असल्याचा फोटो रितेश देशमुखने शेअर केला आहे. स्थलांतरीत मजुरांचा घरी परतण्याचा खर्च आपण एक देश म्हणूनच करावा, असं रितेशने म्हटलं आहे.

मजुरांना  रेल्वेसेवा विनामूल्य दिली पाहिजे. आधीच हे मजूर पगाराविना आहेत. त्यात राहण्यासाठी जागा नाही आणि त्यांना कोरोनाचे संक्रमण होण्याची भीती आहे, असं रितेशने म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोना संकटकाळात सर्वात जास्त अडचणीत आलेल्या गरिब, कष्टकरी, मजूरांच्या घरी जाण्याचा खर्च काँग्रेस करणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यासंदर्भात घोषणा केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘नैतिकतेच्या मुद्द्यावर तुम्ही इतिहासजमा झाला आहात’; आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

-पिठाच्या पिशव्यांमधून गरिबांना खरंच 15 हजार रुपये वाटले का?; आमिर खाननं स्वतः केला खुलासा

-“भारतात कोरोनाचा संसर्ग लवकरच आटोक्यात येईल”

-मजुरांच्या घरी जाण्याच्या प्रवासाचा खर्च काँग्रेस करणार; सोनिया गांधींची मोठी घोषणा

-…तर मुंबईतून केंद्र सरकारला जाणारा सगळा कर रोखू; शिवसेना खासदाराचा केंद्र सरकारला इशारा