oscars 2021: ‘या’ चित्रपटानं 2021 सालातील तीन पुरस्कारांवर कोरलं नाव, पाहा विजेत्यांची यादी

नवी दिल्ली| जगातील महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाणारा आॅस्कर 2021 पुरस्कार सोहळा लॉस एजेंलिसमध्ये काल म्हणजेच 25 एप्रिलच्या रात्री पार पडला. 93 व्या ऑस्कर अवॉर्ड सोहळा आज लॉस अँजेलिसमध्ये पार पडला आहे. मात्र यंदा नेहमीसारखा साजरा होणाऱ्या ऑस्कर सोहळा थोड्या वेगळ्या पद्धतीने पार पडतो आहे. जगभरात कोरोनाचा कहर आहे. त्याची दखल घेऊन अनेक गोष्टी यंदा या सोहळ्यात बदलण्यात आल्या आहेत.

आॅस्कर सोहळ्याची संपूर्ण सिनेविश्वाला उत्सुकता असते. जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना या नामांकन मिळालेली असतात. त्यामुळे जगभरातील कलाकांरासह तमाम रसिक प्रेक्षक या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहात असतात.

दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात होणारा आॅस्कर पुरस्कार प्रदान सोहळा यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आॅनलाईन घेण्यात आला. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नोमालँड चित्रपटाचा जलवा पहायला मिळाला.

नोकरी गेल्यानंतर घराबाहेर पडून फिरायला निघालेल्या एका महिलेची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. फ्रान्सिस मॅकडॉर्मंड हिने या सिनेमात या महिलेची मुख्य भूमिका साकारली आहे.

या सिनेमाने तीन पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. या सिनेमासाठी अभिनेत्री फ्रान्सिस मॅकडॉर्मंड हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर क्लोई जाओ यांना दिग्दर्शनासाठी पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर ‘नोमडलँड’ या सिनेमाने सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार पटकावत 2021 सालातील आॅस्कर पुरस्कारावर नाव कोरलं आहे.

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘द प्रॉमिसिंग यंग वुमन’,  ‘द फादर’, ‘नोमेडलँड’, ‘साऊंड ऑफ मेटल’ ‘जुडास अ‍ॅण्ड द ब्लॅक मसीहा’ या सिनेमांना वेगवेगळ्या श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

आॅस्कर 2021 विजेत्यांची यादी – 

सर्वोत्कृष्ट चित्रपट- Nomadland

सर्वोत्कृष्ट अभिनेता- एंथनी हॉपकिंस (द फादर)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- फ्रांसेस मैकडॉर्मेंड (नोमाडलैंड)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- चुलू जौ (नोमाडलैंड)

बेस्ट सपोर्टिंग एक्टर- डैनियल कलुया (जुडास एंड द ब्लैक मसीहा)

बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस- यून यू-जंग (मिनारी)

बेस्ट ओरिजनल सॉन्ग- फाइट फॉर यू (जूदास एंड द ब्लैक मसीहा)

बेस्ट ओरिजनल स्कोर- सोल

बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले- Emrald Fennel(प्रोमिसिंग यंग वुमन)

बेस्ट इंटरनेशनल फीचर फिल्म- अनदर राउंड

बेस्ट डॉक्यूमेंट्री शॉर्ट सब्जेक्ट- कोलेट

बेस्ट अडैप्टेड स्क्रीनप्ले- Christopher Hampton, Florian Zeller (द फादर)

बेस्ट मेकअप एंड हेयरस्टाइलिंग- Sergio Lopez-Rivera, Mia Neal, Jamika Wilson (मा रेनीज ब्लैक बॉटम)

बेस्ट कॉस्टयूम- चैडविक बोसमैन आणि Viola Davis (मा रेनीज ब्लैक बॉटम)