Oscars 2024 Live Streaming l 96 वा अकादमी पुरस्कार जसजसा जवळ येत आहे, तसतशी उत्सुकताही वाढत आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील हॉलीवूडमधील प्रतिष्ठित डॉल्बी थिएटरमध्ये 10 मार्च रोजी बहुप्रतिक्षित पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. चौथ्यांदा, कॉमेडियन जिमी किमेल ऑस्कर 2024 च्या ग्लॅमरने भरलेल्या संध्याकाळचे आयोजन करणार आहे. हॉलिवूड या भव्य सोहळ्यासाठी सज्ज होत असताना ऑस्कर 2024 चे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी भारतीय प्रेक्षकही उत्सुक आहेत. भारतात ऑस्कर 2024 चे लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे होईल हे आह आपण पाहुयात…
Oscars 2024 Live Streaming l भारतीयांना ऑस्कर पुरस्कार सोहळा कधी आणि कुठे पाहता येणार? :
जगातील सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ‘ऑस्कर 2024’ रविवारी रात्री अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणार आहे. मात्र भारतीय प्रेक्षकांना सोमवारी सकाळी म्हणजेच 11 मार्च रोजी या पुरस्कार सोहळ्याचा आनंद घेता येणार आहे.
प्रेक्षकांना डिस्ने प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर ऑस्कर सोहळ्याचे स्ट्रीमिंग पाहता येणार आहे. याशिवाय स्टार मुव्हीज, स्टार मुव्हीज एचडी आणि स्टार वर्ल्ड या चॅनेलवर पहाटे 4 वाजल्यापासून शोचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.
Oscars 2024 Live Streaming l ऑस्कर 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या शर्यतीत ‘ओपनहायमर’ पुढे :
‘ओपेनहायमर’ला ऑस्करमध्ये अनेक नामांकने मिळाली आहेत. सिलियन मर्फी अभिनीत नाटकाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह 13 नामांकने मिळाली आहेत. BAFTA, Critics Choice आणि Golden Globes सारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये ‘Openheimer’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता.
तसेच क्रिस्टोफर नोलनचा ब्लॉकबस्टर बायोपिक ऑस्कर 2024 च्या सर्वोत्कृष्ट चित्राच्या शर्यतीत देखील आघाडीवर आहे. ‘पुअर थिंग्ज’लाही हा पुरस्कार मिळू शकतो. या चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री एम्मा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.
news Title : Oscars 2024 Live Streaming
महत्त्वाच्या बातम्या-
बाईक खरेदी करण्याआधी ABS आणि Non ABS बाइक्समध्ये काय फरक असतो हे माहित असायलाच हवं!
कोथिंबीर करील कित्येक आजारांवर मात, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
सोन खरेदी करायचंय? जरा थांबा; 120 तासांत 5 वेळा केले रेकॉर्ड ब्रेक
आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींनी फसवणुकीपासून सावध राहावे
OnePlus 13 स्मार्टफोन संबंधित महत्वाची माहिती समोर! कॅमेरा असणार खास