‘…नाहीतर अमेरिकेला परिणाम भोगावे लागतील’; चीनची अमेरिकेला धमकी

बीजिंग | भारतानंतर आता अमेरिकाही टिक टॉकवर बंदी घालण्यासाठी पाऊले उचलू लागला आहे. नुकतंच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 15 सप्टेंबर पर्यंत टिक टॉक अमेरिकेला विकला जावा, नाहीतर टिक टॉकला अमेरिकेतही बंदी घालण्यात येईल असं स्पष्ट केलं आहे. अमेरिकेच्या या निर्णयावर चीनने संताप व्यक्त केला आहे.

अमेरिकन कंपन्यांच्या बाबतीत इतर देशही अशीच पाऊलं उचलू शकतील. अमेरिकेने विनाकारण वाद घालू नये नाहीतर याचा परिणाम अमेरिकेलाही भोगावा लागेल, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वॅंग वेन्सबीन यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेने आपल्या देशातील नागरिकांची त्याचप्रमाणे, आंतराष्ट्रीय समुदयाची मतं लक्षात घ्यावीत. आर्थिक गोष्टींचे विनाकारण राजकारण करू नये, असंही वेन्सबीन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अमेरिकेतील नामांकित कंपनी ‘मायक्रोसॉफ्ट’ने टिक टॉक खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र 15 सप्टेंबरपर्यंत अमेरिका टिक टॉक खरेदी करू शकेल, अशी कोणतीही चिन्हे दिसून येत नाहीत.

महत्वाच्या बातम्या-

…तेव्हा अमृता फडणवीसांना मुंबई असुरक्षित वाटली नाही का?; रेणुका शहाणेंची मिसेस फडणवीसांवर टीका

पुणे हादरलं! दारूसाठी पैसे न दिल्याने जन्मदात्यानेच कटर ने वार करत मुलीचं डोकं फोडलं

ऐकावं ते नवलंच! कैदी मुलाला सोडवण्यासाठी आईने खोदलं भलं मोठं सुरंग पण…

…तर अमृता फडणवीसांना राज्य सोडून जावं लागेल, हाच उपाय ; शिवसेना मंत्र्यांची फडणवीसांवर टीका

समुद्रात अडकले सुमारे 1 लाख मच्छीमार; प्रशासन अजूनही शांत