मुंबई | झी मराठी (Zee Marathi) या वाहिनीवरचा किचन कल्लाकार (Kichan kallakar) हा कार्यक्रम सर्वांना आवडतो. हा कार्यक्रम आता घराघरात पोहोचला आहे. या कार्यक्रमात अनेक प्रमुख पाहुण्यांना बोलवलं जातं.
किचन कल्लाकार या शोचे महाराज म्हणजेच प्रशांत दामले (Prashant Damle) पाहुण्यांसोबत गप्पा मारताना दिसतात अनेक गोष्टींवर या कार्यक्रमात चर्चा होत असते. या शोचा पुढील प्रोमो सध्या रिलीज करण्यात आला आहे.
अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी या कार्यक्रमात येणार आहे. त्याचा पुढील प्रोमो सध्या रिलीज झालाय. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी देखील हजेरी लावली.
या कार्यक्रमात प्रशांत दामले यांनी फिरकी घेतली. त्यावेळी त्यांनी देवेंद्रजी किती पुरणपोळ्या खाऊ शकतात?, असा सवाल प्रशांत दामले यांनी विचारला.
आमचे देवेंद्रजी 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे, असं उत्तर अमृता फडणवीस यांंनी यावेळी दिलं आहे. त्यावेळी त्यांना आणखी एक प्रश्न विचारला.
लग्नानंतर तुमची कोणती अपूर्ण राहिलेली इच्छा राहिली?, असंही त्यांना विचारण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खाताना पाहायची इच्छा अपुर्ण राहिली, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
आमच्या फ्रीजमधून मध्यरात्री पदार्थ गायब होत होते. त्यामुळे मी सीआयडी चौकशी लावली. मी त्यांची संगिनी आहे. फ्रीज बदलले आणि कुलूप किल्ल्यांचे फ्रीज आणले. आता फ्रीजच्या चाव्या मी माझ्याकडे ठेवते, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
‘संजय राऊत महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक, त्यांना….’; तुषार भोसले भडकले
‘मामी गप्प बसा….’; शिवसेनेच्या ‘या’ महिला नेत्याची अमृता फडणवीसांवर बोचरी टीका
प्रेस कॉन्फरन्समध्ये सोमय्यांनी प्रत्यक्ष हातात जोडे घेतले, म्हणाले, ‘मारा मला मी…’
“खुशाल चौकशी करा, मी मुलासह जेलमध्ये जाण्यास तयार, पण… “
काळजी घ्या! कोरोनाबाधित रुग्णांवर केलेल्या संशोधनातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर