‘आमचे राज्यपाल करुणेचा सागर, पण…’; संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा

मुंबई | राज्यात सध्या राजकीय वर्तुळात चांगलंच वातावरण तापलेलं दिसतं आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांमध्ये आ.रोप-प्रत्युत्तरांची खेळी रंगलेली पाहायला मिळत आहे.

राज्यातील महाविकास आघाडीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावाची यादी पाठवली आहे. पण त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. त्यामुळे गेले दोन-तीन महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा रखडला गेला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.

आमचे राज्यपाल करुणेचा सागर आहेत. याच करुणा भावनेनं त्यांनी कायदा आणि घटनेवर करुणा दाखवावी. त्याचबरोबर मांडीखाली दाबून धरलेले 12 राज्यपाल नियुक्त सदस्य त्यांनी मोकळे करावेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र हा संतांचा प्रदेश आहे. करुणेचा उगम हा महाराष्ट्रातूनच झाला आहे. त्यामुळेच कदाचित राज्यपालांना महाराष्ट्रात रमावं वाटतं असेल, असं संजय राऊत म्हणाले आहेत. आज 2 मार्च रोजी ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावरुन विचारण्यात आलं होतं.

राज्यापालांना 12 राज्यपाल नियुक्त आमदार मोकळे केले तर राज्यपालांच्या मनात घटनेविषयी किती करुणा आहे हे देशाला समजंल, असा टोलाही संजय राऊत यांनी भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे.

दरम्यान, मागिल महिन्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे देशातील करोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होताना दिसतं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यपालांनी वक्तव्य केलं होतं.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून, दिवसभरात 8 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. लोकांनी कोरोना महामारीचा मोठा धसका घेतला होता. मात्र मी कोरोनाला कधीही घाबरलो नसल्याचंही भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं होतं.

तसेच कोरोनाला घाबरु नका तर काळजी घ्या, खबरदारी घ्या, हात स्वच्छ धुवा, मास्क वापरा आणि फिजिकल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करा, असं आवाहनही राज्यपालांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कॅटवॉक करणारी गाई तुम्ही पाहिली आहे का? गाईचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल!

 

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy