हैद्राबादमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. हैद्राबादमधील जुबिली हिल्स येथे एका महिलेनं आपल्या अवघ्या आठ वर्षाच्या मुलीसह इमारतीवरुन उडी मारल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
सब इन्स्पेक्टर कन्नेबोइना उदय यांनी दिलेल्या माहितीनुसार बिमल कुमार हा इसम बिहारमधून हैद्राबादमध्ये काही वर्षांपूर्वी स्थायिक झाला होता. नवऱ्यासोबत भांडण झाल्यानं आरती या 22 वर्षिय महिलेनं आपल्या आठ वर्षाच्या चिमुरडीसह दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली.
आरती आणि बिमल या जोडप्याचं अधूनमधून भांडण होत असे. सोमवारी ही घटना घडली त्या दिवशीदेखाील या दोघांमध्ये थोडसं भांडण झालं होतं. रागाच्या भरात आरतीनं तिच्या अवघ्या आठ वर्षाच्या चिमुरडीसह इमारतीवरुन उडी मारली.
तेथील रहिवास्यांनी त्या दोघींना जवळच्या रुग्णालयात हलवलं. या घटनेत 22 वर्षीय आरतीचा जीव गेला असून आठ वर्षाच्या चिमुरडीचा जीव वाचला आहे. मात्र तीची अवस्था क्रिटीकल आहे. नेमकं या घटनेत काय घडलं या गोष्टीचा तपास पोलिस सध्या करत आहे.
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! सभापतींनी ‘या’ 3 खासदारांना राज्यसभेतून केलं नि.लंबित
सुशांत सिंह प्रकरणात ‘हा’ मराठी दिग्दर्शक एनसीबीच्या जाळ्यात
बडीशेप खाण्याचे आरोग्यदायी फायदे
‘आं.दोलन करणारे शेतकरी नसून दह.शतवादी आहेत’; कंगनाच्या ट्वीटनं खळबळ!