नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे.
पी चिदंबरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयाकडून नाकारण्यात आलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निर्णयाला आव्हान दिलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालायने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
प्राथमिक स्तरावर अटकपूर्व जामीन देणं तपासात अडथळा आणू शकतं. अटकपूर्व जामीन देण्यास मान्यता देण्यासाठी हे योग्य प्रकरण नाही. आर्थिक गुन्हे गंभीर असून त्यांना वेगळ्या पद्धतीने हाताळण्याची गरज आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
दरम्यान, आयएनएक्स मीडिया प्रकरणी सीबीआय तपास करत आहेत. सीबीआयबरोबरच ईडीकडूनदेखील या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या-
छोट्या सर्जरीनंतर अमित शहा पुन्हा कार्यरत! – https://t.co/Ms2AaCOz86 @AmitShah
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 5, 2019
लाच म्हणून वेश्यांची मागणी करणारे पोलिस निलंबित- https://t.co/Y08gsXYH3Q #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 5, 2019
पुण्यात अल्पवयीन प्रेयसीची लॉजवर हत्या करुन प्रियकर पसार! – https://t.co/dx5ZdEdDCC #Pune
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 5, 2019