दिल्ली : सध्याची अर्थव्यवस्था, सरकारचा नोटबंदीचा निर्णय यासारख्या सरकारच्या विविध निर्णयांचा विरोध करणारे काँग्रेसचे माजी अर्थमंञी पी. चिदंबरम यांनी आपल्या वक्तव्याने सर्वपक्षीय नेत्यांना बुचकळ्यात पाडलं आहे. मोदींनी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणाची त्यांनी प्रशंसा केली. इतकेच नव्हे तर कुटुंब नियोजन, प्लास्टिक बंदी आणि श्रीमंतांचा सम्मान या निर्णयाचं त्यांनी स्वागतंही केलं आहे.
श्रीमंतांना संशयाच्या नजरेने पाहू नका, त्यांचा सम्मान व्हायला हवा हा मोदींच्या भाषणातील मुद्दा अर्थमंञी तसेच त्यांच्या टीममधील कर अधिकारी आणि तपास अधिकाऱ्यांनी नीट ऐकला असावा, अशी अपेक्षा असल्याचंही पी. चिदंबरम म्हणाले आहेत.
जम्मू काश्मीर हे मुस्लि बहुसंख्यांक राज्य असल्याने केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवलं, असं वादग्रस्क वक्तव्य पी. चिदंबरम यांनी केलं होतं. मात्र मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शवणाऱ्या चिदंबरम यांनी मोदींच्या भाषणाचं कौतुक केल्याचंही पाहायला मिळालं आहे.
दरम्यान, जम्मू कश्मीरमधून 370 कलम हटवण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचे सांगत पी. चिदंबरम यांनी विरोध दर्शवला होता.
महत्वाच्या बातम्या-
-मोदी सरकारचा वेडेपणा थांबणार तरी कधी??; राहुल गांधी भडकले
-सुनील तटकरेंना मोठा धक्का; ‘या’ कट्टर समर्थकानं केला शिवसेनेत प्रवेश
-पूरग्रस्तांना गायी, म्हशी द्या; महेश लांडगेंचं दहिहंडी आणि गणेश मंडळांना आवाहन
-बाळासाहेबांमुळे गिरणी कामगाराचा मुलगा मुख्यमंत्री झाला- नारायण राणे
-बीडचा दुष्काळ हटवण्यासाठी पंकजा मुंडेंची योजना; मुख्यमंत्र्यांकडे सादर