तब्बल 106 दिवसांनी पी. चिदंबरम येणार तिहार जेलबाहेर!

नवी दिल्ली | आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर दिलासा मिळाला आहे. याप्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयानं चिदंबरम यांना दोन लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे.

आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटकेत असलेल्या पी. चिदंबरम यांचा जामीन दिल्ली उच्च  न्यायालयाबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. मात्र बुधावारी सकाळी अकरा वाजता सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांच्या जामीन अर्जावर निकाल दिला आहे.

चिदंबरम यांना 21 ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने अटक केली होती. अटक झाल्यापासून पी चिदंबरम जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन दिला आहे. आता ईडीच्या गुन्ह्यातही पी. चिदंबरम यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या-