मोदी सरकारला कशाचीच शरम नाही अन् ते स्वतःच्या चुका मान्यही करत नाहीत- पी. चिदंबरम

नवी दिल्ली | सध्या संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था चांगलीच कोलमडली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जीडीपी ढासळला आहे. आम्ही सरकारला याबाबत आधीही सतर्क केलं होतं. अर्थमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी वगळता सर्वांना माहित होतं की देशाच्या अर्थव्यवस्थेवरचं संकट हे खेलवर जाणार आहे. संपुर्ण देश याची किंमत आता मोजत आहे. गरीब लोक निराश झाला आहे परंतू मोदी सरकारला त्यांची काळजी नसल्याची टीका पी. चिदंबरम यांनी केली आहे.

पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते BBCला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. तसेच मोदी सरकारला कशाचीच शरम नाही अन् ते स्वतःच्या चुका मान्यही करत नाहीत, असंही पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

मोदी सरकारने जे करायला हवं ते केलं, असं कोणताही अर्थशास्त्रज्ञ मानत नाही. आरबीआयचा अहवाल वाचा त्यामध्ये असं म्हटलं आहे की, मोदी सरकारने साथीच्या काळात आणि नंतरही काही केलं नाही आणि जर सरकारला आणखी वेळ द्यावा असं वाटत असेल तर आपल्यासाठी दु:ख व्यक्त करू शकतो, असं चिदंबरम यांनी सांगितलं.

प्रत्येक क्षेत्रामध्ये सरकारची धोरणे ठरवतात की कोणतं उत्पादन घ्यायचं?, काय घ्यायचं आणि काय विकायचं?, मात्र यामध्ये सुदैवाने देशातील शेतकऱ्यांची शेती आणि त्यांच्यावर देवाचा आशीर्वाद आहे. कारण एकमात्र क्षेत्रात 3. टक्के वृद्धी झाली आहे. ते शेती, वनीकरण आणि मत्स्यपालन या क्षेत्रांमध्ये झाली आह, असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

आर्थिक घसरणीसाठी देवाला दोष देणाऱ्या अर्थमंत्र्यांनी उलट गुप्तपणे देवाचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी देशातील शेतकऱ्यांवर कृपा केली आहे. कारण देशातील कृषी क्षेत्र वगळता कोणत्याही क्षेत्रात वाढ झाली नाही. मात्र इतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याचं चिदंबरम यांनी सांगितलं.

दरम्यान, सध्या बांधकाम, व्यापार, हॉटेल आणि उत्पादन या सर्व गोष्टी 40 ते 50 टक्यांदरम्यान खाली आलं असल्याचं म्हणत चिदंबरम यांनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

सीबीआय समोर अखेर रियानं उलघडलं महेश भट्ट आणि तिच्या नात्याविषयीचं गूढ

“वंचित बहुजन आघाडीची पावलं हिंदुत्वाच्या दिशेने पडत असतील तर नव्या दिंडीयात्रेचं स्वागत”

“इतर स्टार्सप्रमाणे तुझंही करिअर संपवून टाकेन अशी धमकी सुशांतला दिली होती”

“रिया चक्रवर्ती ही फक्त एक मुखवटा असून मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे”

दारूप्रमाणे मंदिरातून महसुल मिळाला असता तर…; भाजपची ठाकरे सरकारवर गंभीर टीका