नवी दिल्ली | भारताची सुप्रसिद्ध बॅटमिंटनपटू पी. व्हि. सिंधू (P. V. Sindhu) हिने कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth 2022) मध्ये उतकृष्ट प्रदर्शन करत भारताचे आणि भारतीयांचे नाव मोठे केले आहे.
आज झालेल्या अंतिम सामन्याच्या लढतीत तिने कॅनडाच्या मिशेल ली (Michelle Lee) वर सलग दोन फेऱ्यांमध्ये आपला विजय निश्चित केला. यामुळे तिचे नाव सुवर्णपदकावर (Gold Medal) कोरले गेले आहे.
कॅनडाच्या मिशेल लीवर सिंधूने 21- 15 आणि 21 – 13 असा विजय मिळवला. या यशानंतर सिंधू भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. सिंधूला या अभूतपूर्व विजयानंतर आनंदाश्रू अनावर झाले.
जिकंल्यावर सिंधूने तळव्यात आपला चेहरा झाकूण घेतला. ती थोडी रडली आणि नंतर तिने स्वत:ला सावरत शिक्षकांना (Coach) मिठी मारली. सिधूने कॉमनवेल्थ खेळात पहिल्यांदा सुवर्णपदक पटकावले.
पी. व्हि. सिंधूची 2014 आणि 2018 मध्ये सुवर्णपदक जिंकण्याची संधी हुकली होती. 2014 साली तिला कांस्यपदक (Bronze Medal) मिळाले होते, तर 2018 साली तिला रौप्यपदक (Silver Medal) मिळाले होते. आणि आज पहिल्यांदा तिने सुवर्णपदक (Gold Medal) पटकावात देशाचे नाव मोठे केले.
पी. व्हि. सिंधू सध्या भारताची आघाडीची बॅटमिंटनपटू आहे. तिच्या नावावर सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची नोंद आहे. वर्ल्ड चँपियनशीपमध्ये तिला आतापर्यंत पाच मे़डल्स मिळाली आहेत.
सिंधूच्या नावावर आशियाई गेम्समध्ये देखील रौप्यपदकाचा विक्रम देखील आहे. आता तिने कॉमनवेल्थ गेममध्ये तिने सुवर्णपदक मिळविले आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘यांच्या बापजाद्याने कधी 50 कोटी पाहिले नसतील’; खडसे बंडखोरांवर बरसले
“प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो, शिंदे साहेब वाईट वाटलं”
टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे अब्दुल सत्तारांपर्यंत, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर
बिहारमध्ये राजकीय भूकंप होणार?, नितीश कुमार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
‘ईडीविरोधात काँग्रेस रस्त्यावर, तुम्ही…’; शिवसेनेचा सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादीला प्रश्न