मुंबई | राज्यात विद्यार्थी आणि परीक्षा घेणाऱ्या संस्थांमध्ये सातत्यानं वाद होत आहेत. काही दिवसांपूर्वी पदभरतीचा गोंधळ होता. आता एमपीएससी संयुक्त परीक्षेचा गोंधळ निर्माण झाला आहे.
राज्यात पदभरतीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचं खुद्द पुणे पोलिसांनी आपल्या तपासानंतर सांगितलं होतं. त्यानंतर काही दिवस वातावरण शांत होतं.
एमपीएससीच्या गट-ब संयुक्त परीक्षेच्या मुख्य परीक्षेची तारीख अवघ्या चार दिवसांवर आली आणि न्यायालयाच्या एका निर्णयानं राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे.
संयुक्त पुर्वपरीक्षा-2020 च्या उत्तर तालिकेबाबत राज्यातील तब्बल 86 विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल लागला आणि राज्यात वातावरण तापलं आहे.
उच्च न्यायालयाने या विद्यार्थ्यांना दिलासा देताना त्यांना संयुक्त परीक्षेच्या मुख्य परीक्षेस बसवण्याची मागणी मान्य केली आहे. परिणामी आता राज्यभरातील इतर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
त्या विद्यार्थ्यांचं चांगलं झालं मात्र याचिका दाखल न केलेल्या आणि एमपीएससीच्या चुकांमुळं मुख्य परीक्षेला अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचं काय होणार यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे.
भाजप नेते आणि विविध आंदोलनात सक्रिय सहभाग घेणारे नेते म्हणून प्रसिद्ध असणारे गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राज्यातील 3500 विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय. मला सरकारला सांगायचं आहे की, विद्यार्थी आक्रमक झाले तर कोणतंही पाऊल उचलू शकतात. परिणामी मुख्यमंत्र्यांनी यावर त्वरित निर्णय घ्यावा, असं पडळकर म्हणाले आहेत.
या प्रकरणात सरकारनं कारवाई करावी अन्यथा एखाद्यानं स्वप्निल लोणकर सारखं पाऊल उचललं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य सरकारची असेल, असं पडळकर म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा विरोधी पक्ष नामर्द”, संजय राऊतांचा हल्लाबोल
भारतात फिरू नका, बलात्कार, दहशतवादाच्या घटना वाढत आहेत- जो बायडन
“हे सरकारी ऑफिस आहे, कुणाच्या बापाचं ऑफिस नाहीये”