जनरल बिपीन रावत यांच्यासह ‘या’ तीन दिग्गजांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली | देश आपला प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या तयारीत आहे. देशाच्या सर्वांगिण विकासात प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व प्रचंड आहे. या निमित्तानं केंद्र सरकार विविध पुरस्कारांची घोषणा करत आहे.

देशाच्या विकासात सर्व क्षेत्रांचं असलेलं योगदान लक्षात घेतलं जातं. कला, विज्ञान, क्रिडा, सुरक्षा, पर्यावरण, राजकारण, पर्यटन, आणि अधिक क्षेत्रांत योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं.

देशाच्या सुरक्षेत मोठं योगदान देणारे देशाचे पहिले तिन्ही दलप्रमुख जनरल बिपीन रावत यांचं काही दिवसांपूर्वी हेलिकाॅप्टर अपघातात निधन झालं. देशाच्या सुरक्षेतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना मरणोपरांत पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात  आलं आहे.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना देखील मरणोपरांत पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. कल्याण सिंह यांचं काही दिवसांपूर्वी प्रदिर्घ आजारानंतर निधन झालं होतं.

प्रसिद्ध गायिका प्रभा आत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. प्रभा आत्रे हे नाव गायन क्षेत्रातील दिग्गजांमध्ये येतं. त्याच्या गायनानं अनेकांना उभं केलं आहे.

गीता प्रेसचे अध्यक्ष राधे श्याम खेमका यांना देखील मरणोपरांत पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. राधे श्याम खेमका यांनी अनेक वर्ष गीता प्रेसच्या माध्यमातून काम केलं आहे.

देशाच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशातील 4 जणांना पद्मविभूषण, 17 पद्मभूषण तर 107 जणांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.

दरम्यान, जनरल बिपीन रावत यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्यानं त्यांच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. देशाच्या सुरक्षेत रावत यांचं योगदान अमर्यादित होतं.

महत्त्वाच्या बातम्या – 

 राष्ट्रवादीने फोडला काँग्रेसचा गड! तब्बल 27 नगरसेवकांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

राहुलची कर्णधार म्हणून काराकिर्द संपुष्टात?, बीसीसीआय अधिकाऱ्याचं मोठं वक्तव्य

‘लेडी सेहवाग’चा जलवा बरकरार! पुन्हा जागतिक क्रमवारीत गाठलं अव्वल स्थान

 “किंग कोहलीचं युग संपलंय, आता नव्या कॅप्टनला…”, विराटच्या कोचचं मोठं वक्तव्य

“पूनम महाजन सध्या कुठं आहेत? त्यांचं भाजपशी नातं काय?”