देश

“खटला कुठेही चालू द्या, पाकिस्तानला कूलभूषण यांना न्याय द्यावाच लागेल”

हेग (नेदरलँड) : भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कूलभूषण जाधव प्रकरणी नेदरलँड न्यायालयाने भारताच्या बाजूने निर्यण दिला आहे. न्यायमूर्तींनी 15 विरुद्ध 1 अशा मतांनी निर्णय देण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या मिलिट्री कोर्टाने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. हा खटला मिलिट्री कोर्टात जरी सुरु केला तरीही त्यांना निष्पक्ष न्याय द्यावाच लागेल, असंही साळवे यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे.

जर मिलिट्री कोर्टाचे नियम त्याच्या आड येत असतील तर त्यात बदल करावे लागतील. असं करण्यास पाकिस्तान बांधिल असल्याचं हरिश साळवे यांनी सांगितलं आहे.

भारतासाठीचा हा सर्वात मोठा खटला लढण्याची जबाबदारी दिग्गज वकील हरिश साळवे यांच्याकडे होती. हा आपला मोठा विजय आहे, असं सांगत हरिश साळवे यांनी ‘आयसीजे’च्या निर्यणयाचं स्वागत केलंय.

फक्त पाकिस्तानचे न्यायमूर्ती या निर्यणाच्या विरोधात होते. पाकिस्तानने ‘व्हिएन्ना’ कराराचं उल्लंघन केलं असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे.

जाधव यांना निष्पक्ष पद्धतीने न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त करण्याची सध्या वेळ आहे. जर पाकिस्तानने न्याय दिला नाही तर आपण पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे जाण्यास मोकळे आहोत, असं साळवे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

-सत्य आणि न्यायाचाच विजय झाला; कूलभूषण जाधव प्रकरणी मोदींची प्रतिक्रिया

-माझ्या वाढदिवसावर वायफळ खर्च करु नका; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

-चंद्रकांत पाटील म्हणतात शिवसेनेने काढलेला मोर्चा योग्यच!

-मी येतोय… सगळ्यांचे आभार मानायला आणि मनं जिंकायला- आदित्य ठाकरे

-शिवसेनेला मोर्चाच काढायचा होता तर ‘वर्षा’ बंगल्यावर का नाही काढला??- निलेश राणे

IMPIMP