नवी दिल्ली | कोरोना व्हायरस जगभरात थैमान घालत असताना अनेक देशांनी लढा देण्यासाठी लॉकडाउन जाहीर केलं आहे. पाकिस्तानातही कोरोनाने शिरकाव केला असून लॉकडाउन केलं जावं अशी मागणी होत आहे. मात्र पंतप्रधान इम्रान खान यांनी हे शक्य नसल्याचं सांगितलं आहे.
पूर्ण लॉकडाउन करणं म्हणजे कर्फ्यू लागू करणे. लोकांना जबरदस्ती घऱाच्या आत राहण्यास भाग पाडणे. आमच्या देशातील 25टक्के जनता ही दारिद्र्य रेषेखाली जगत असून रोजंदारीच्या कमाईवर आपलं पोट भरते. आम्ही आमची स्थिती लक्षात घेता योग्य ती पाऊलं उचलत आहोत, असं इम्रान खान यांनी सांगितलं आहे.
आम्ही आमच्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जबाबदारीने वागण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंग, अलगीकरण आणि विलगीकरण यांचा सराव करत आपली आणि इतरांची सुरक्षा करणंही गरजेचं आहे, असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सोशल डिस्टन्सिंग, अलगीकरण आणि विलगीकरण यांचा सराव करत आपली आणि इतरांची सुरक्षा करणंही गरजेचं असल्याचंही इम्रान खान यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-#Corona | लालबाग गणेश मंडळ पुढे सरसावलं; रक्तदान शिबिराचं केलं आयोजन
-“परिस्थिती गंभीर असली तरी सरकार खंबीर आहे”
-दुसऱ्या दिवशी घराबाहेर येऊन फिरण्यासाठी ‘जनता कर्फ्यू’ लावला होता काय?- राज ठाकरेंचा सवाल
-जमावबंदीचे आदेश झुगारुन वाहनांच्या रांगा; यांना नक्की जायचंय तरी कुठं???
-पुणेकरांना आता वाहनेही बाहेर काढता येणार नाहीत, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय