पूर आणि भीषण महागाईमुळे पाकिस्तान आला ताळ्यावर; भारताकडे केल्या ‘या’ मागण्या

नवी दिल्ली | शेजारील राष्ट्र पाकिस्तान (Pakistan) गेले अनेक दिवस पूर आणि महागाईच्या विळख्यात आहे. मागील अनेक दिवसांत पाकिस्तानातील सिंध (Sindha)  आणि इतर प्रांतात मोठा पाऊस झाला होता.

त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आणि त्यामुळे रोजच्या गरजेच्या वस्तूंचा तुटवडा देशात पडला. पाकिस्तानात भाज्या आणि फळांचे भाव गगनाला भिडले आहेत.

आता पाकिस्तानने आपल्यासोबत असलेल शत्रुत्व विसरुन भारताकडे मदतीचा हात मागितला आहे. भारतातून पुन्हा पाकिस्तानात व्यापार सुरु करण्यात येणार आहे. तशी मागणी पाकिस्तानने केली आहे.

पाकिस्तान भाजीपाला आणि इतर गरजेचे खाद्यपदार्थ भारतातून आयात करण्याच्या तयारीत आहेत. याबाबत पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ता इस्माईल (Miftah Ismail) यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.

लाहोर प्रांतात कांदा 500 रुपये प्रति किलो तर टोमॅटो 400 रुपये प्रति किलो भावाने खरेदी विक्री केला जात आहे. पूरामुळे बलुचिस्तान, सिंध आणि दक्षिण पंजाब भागांत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

सध्या लाहोर प्रांतात अफगाणिस्तानातून कांदे आणि टोमॅटो मागविले जात आहेत. त्यामुळे आता पाकिस्तान भारतासोबत असलेले वैर काही काळ विसरुन पुन्हा आयात सुरु करणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

शरद पवार आक्रमक, ‘या’ कारणांमुळे नरेंद्र मोदींना सुनावले खडे बोल

शिवसेनेच्या ‘दसरा मेळाव्या’वरुन राज ठाकरे यांचे ट्विट चर्चेत

गोकुळच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ; शौमिका महाडिक म्हणाल्या, “सत्ताधारी लोक…

नोएडातील ट्विन टॉवर पाडण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांना मोठा दणका

सत्ताधाऱ्यांना शरद पवारांची संगत का नको? जाणून घ्या कारणे