आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्यापूर्वी पाकिस्तानी वकिलाने टेकले गुडघे!

इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरसाठीचे कलम 370 रद्द केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने अनेक टोकाचे निर्णय घेतले. पण आता तेच निर्णय त्यांच्यावर उलटल्यानंतर पाकिस्तानवर पुन्हा एकदा भारतासमोर गुडघे टेकण्याची वेळ आली आहे. काश्मीर आंतरराष्ट्रीय मुद्दा असल्याचे सिद्ध करण्यास अपयशी ठरल्यानंतर पाकने भारतासोबतचे सर्व व्यापार थांबवण्याचा निर्णय घेतला होता. 

पाकिस्तानचा हा माज फार दिवस टिकला नाही. त्यांची हा माज काही दिवसातच उतरला. जीवनावश्यक औषधांची कमतरता जाणवू लागल्याने पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार पुन्हा सुरू केला आहे. पाकिस्तान सरकारने भारतात तयार झालेल्या जीवनावश्यक औषधांच्या आयतीला परवानगी दिली आहे.

भारतात तयार झालेल्या औषधांच्या आयात आणि निर्यातीला पाकिस्तानच्या व्यापर मंत्रालयाने सोमवारी परवानगी दिली. यासंदर्भातील एक अध्यादेश जारी करण्यात आला आहे. पाकिस्तान मोठ्या प्रमाणात भारतात तयार झालेली औषधांची आयात करत असतो.

पाकिस्तानला आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या औषधांसाठी तो भारतावर अवलंबून आहे. एका रिपोर्टनुसार गेल्या 16 महिन्यात पाकिस्तानने भारताकडून 250 कोटींहून अधिक फक्त रेबिज आणि अन्य औषधांची खरेदी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-