इस्लामाबाद : जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवल्यापासून तीळपापड झालेल्या पाकिस्तानने आता नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसतंय. दोन्ही देशांमध्ये असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी, भारताविरोधात युद्धाची सुरूवात पाकिस्तान कधीही करणार नाही, असं वक्तव्य केलं आहे.
पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही देश अण्वस्त्र संपन्न आहेत. दोन्ही देशांमधील तणावाचा संपूर्ण जगाला धोका आहे. मी भारताला सांगू इच्छितो की, युद्ध कोणत्याही समस्येवर उपाय ठरु शकत नाही. युद्धात जिंकणाऱ्या देशालाही खूप काही गमवावं लागतं आणि अखेरीस तोही पराभूत ठरतो, असं इम्रान खान यांनी म्हटल आहे.
लाहोरमध्ये शीख समुदायांच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना इम्रान खान यांनी हे वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत यापूर्वी झालेल्या फोनवरील चर्चेचाही मुद्दा खान यांनी यावेळी मांडला.
भारताशी चर्चेसाठी अनेकदा प्रयत्न करुनही काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याचं सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. “मी जेव्हा जेव्हा भारताशी चर्चेचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा भारताने स्वतः सुपरपॉवर असल्याचा आव आणला, आणि तुम्ही असं करा किंवा तसं करा अशाप्रकारचे आदेश उलट आम्हालाच दिले”, असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
….तर कायदा आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल; पवारांनी व्यक्त केली भिती https://t.co/5bIfdLJGdX @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019
भारतीय गोलंंदाज मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरंट https://t.co/YDFGYFeKof #Mohmmadshami
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019
एकेकाळी सोबत असणाऱ्या नेत्याचा पवारांवर बोचरा वार; राष्ट्रवादीत कोण बाकी राहिलं आता?? https://t.co/rgYHE372k9 #kshirsagar_jaydatta @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019