Top news मनोरंजन

पाकिस्तानी रॅपरनं आलिया भट्टवर बनवलं रॅप; रॅप ऐकून आलिया म्हणाली….

Photo Credit - Muhammad Shah / Instagram

मुंबई| बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. आलियाच्या हटके अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. आलियाचे चाहते फक्त भारतातचं नाही, तर पाकिस्तानात देखील आहेत.

पाकिस्तान मधील एका रॅपरने आलियावर एक रॅप तयार केला आहे. त्याचा हा रॅप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावर आलियाने स्वत: यावर कमेंट देखील केली आहे.

आलियाच्या चाहत्याचं आणि रॅपरचं नाव मोहम्मद शाह असं आहे. मोहम्मदने आलियावर बनवलेलं रॅप सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. आलियाने गल्ली बॉयमधील ‘बहुत हार्ड’ हा डायलॉग म्हणत पोस्टवर कमेंट केलं.

पाकिस्तानी रॅपर मुहम्मद शाहनं नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्याच्या आलिया भट्टवर तयार केलेल्या रॅपचा आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला त्याचा मित्र त्याला आलिया भट्टवर गाणं तयार करण्याचा सल्ला देतो. त्यानंतर आलिया रॅप हा रॅपर गाताना दिसतो आणि सर्वात शेवटी तो म्हणतो, पण तिचा तर बॉयफ्रेंड आहे मग जान्हवी कपूरवर एक गाणं तयार केलं पाहिजे. यावरून असं वाटतंय की हा रॅपर लवकरच जान्हवीवरही एखादं रॅप तयार करेल.

आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती लवकरच अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपटसुद्धा आहे.

दरम्यान, कोरोनाच्या विळख्यातून सुटल्यानंतर रणबीर आणि आलिया मालदीवला गेले आहेत. रणबीर कपूर मार्च महिन्यात कोरोना संक्रमित झाला होता. त्यानंतर आलियाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. आता दोघंही कोरोनामुक्त झाले आहेत. यानंतर या दोघांना मुंबई एअरपोर्टवर कॅज्युअल लूकमध्ये पाहण्यात आलं.

आलिया भटने 2012 साली करण जोहरच्या ‘स्टुडन्ट ऑफ द इअर’ या चित्रपटामधून अभिनय श्रेत्रात पदार्पण केलं. तिने तिच्या अभिनयाने सर्वांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. 2016 मध्ये तिला ‘उडता पंजाब’ या चित्रपटामधील भूमिकेसाठी फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्रीचा अवॉर्ड मिळाला होता.

सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. यादरम्यान अनेकांना कोरोनाची लागण होत असून, यामध्ये सर्वसामान्यांपासून ते स्टार कलाकारांनी कोरोनाची लागण झालेलं समजलं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Muhammad Shah (@iamtheshah)

महत्वाच्या बातम्या – 

‘तीन मुलं जन्माला घालणाऱ्यांना तुरुंगात पाठवा’,…

12 वर्ष लहान असलेल्या करीनाशी लग्न का केलं? सैफ अली खाननं…

‘या’ अभिनेत्रीला एकदा सोडून दुसऱ्यांदा झाली…

रितेश देशमुखचा ‘हा’ व्हिडीओ होतोय तूफान व्हायरल,…

महिलेनं चक्क मगरीच्या जबड्याजवळ हात नेला अन्…, पाहा…

IMPIMP