मुंबई | विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर व्हायला अवघे काही दिवस राहिलेत. महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. माझी राष्ट्रवादीला भिती वाटते… म्हणूनच पवारांनी बीडला येऊन उमेदवार जाहीर केले, असं त्यांनी म्हटलं आहे.
मी पाच वर्षे जनतेची कामे केली आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले आहेत. मला विधानसभेची अजिबात काळजी नाही, असं पंकजा म्हणाल्या.
माझ्या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या कामाचे नाहीत. मी निवडणुकीची कसलीही चिंता करत नाही, असं त्या म्हणाल्या.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शरद पवार बीड दौऱ्यावर होते. यावेळी बीडच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी विधानसभेच्या पाच उमेदवारांची घोषणा केली.
दरम्यान, पवारांनी जाहीर केलेल्या नावांमध्ये परळीमधून धनंजय मुंडे, गेवराईमधून विजयसिंह पंडित, केजमधून नमिता मुंदडा, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगावमधून प्रकाश सोळंके यांच्या नावांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
“या भितीमुळेच शरद पवारांनी उमेदवारांची घोषणा केली”- https://t.co/85j4SLEifp @Pankajamunde @PawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 19, 2019
काँग्रेस-राष्ट्रवादी तर आमच्या खिजगणतीतही नाही- प्रकाश आंबेडकर – https://t.co/B59mgbvaNm @Prksh_Ambedkar
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 19, 2019
…तर गडांवर छ्मछम देखील होईल… हा शिवबांचा महाराष्ट्र नाही; पवारांचे फडणवीसांना खडे बोल https://t.co/7sEEOA8Pad @PawarSpeaks @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 19, 2019