“पंकजा मुंडे यांची ठाकरे कुटुंबीयांशी जवळीक”

मुंबई : पंकजा मुंडे यांची ठाकरे कुटुंबीयांशी जवळीक आहे. महाजन, मुंडे कुटुंबीय व्यक्तिगत नेहमीच ठाकरे कुटुंबीयांच्या जवळ राहिलेले आहेत. पण याचा अर्थ म्हणजे पंकजा मुंडे भाजप सोडून शिवसेनेत जातील, असा नाही, असं म्हणत भाजप नेते विनोद तावडे यांनी पंकडा मुंडे पक्ष सोडतील या सुरु असणाऱ्या चर्चांवर भाष्य केलं आहे.

पंकजा मुंडे यांच्या निष्ठेवर भाजपचा संपूर्ण विश्वास आहे. त्यांनी फेसबुकपोस्टद्वारे केवळ त्यांच्या सहकाऱ्यांना आणि अनुयायांना निमंत्रण दिलेलं आहे. उगाच चुकीचा अर्थ काढू नका. त्या पुढे देखील पक्षाचं काम करत राहतील, असं विनोद तावडे म्हणाले आहेत.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा जन्मदिवस 12 तारखेला असतो. त्याचा जन्मदिवस महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यंदा आम्ही सर्व भाजप नेते त्या कार्यक्रमात सामील होणार आहोत. पंकजा मुंडे भाजपमध्ये होत्या आहेत आणि असती. त्या भाजपशिवाय दुसरा विचारही करू शकत नाहीत, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनीही या चर्चांवर उत्तर दिलं आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंकजा मुंडेच काय पण भाजपचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात आहेत, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-