पंढरपूर | पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके भाजपच्या वाटेवर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत. भाजपकडून ते तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न देखील करत आहेत. मात्र त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना भाजपने पंढरपुरातून विधानसभा निवडणुकीची उमेदवारी द्यावी, अशी मागणी परिचारक गटाने केली आहे. तसेच सुधाकरपंतांनी देखील लढण्याची तयारी दाखवली आहे.
भाजपने तिकीट नाही दिलं तरी तुम्ही अपक्ष लढा, असं सुधाकरपंत परिचारक यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे.
सुधाकरपंत हे भाजपचे वादग्रस्त आमदार प्रशांत परिचारक यांचे चुलते आहेत. सुधाकरपंत राष्ट्रवादीचे आमदार होते. मात्र 2014 ला त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला.
भालकेंना भाजपने उमेदवारी दिली, तर सुधाकरपंत अपक्ष निवडणूक लढवून मोठं आव्हान उभं करु शकतात. पंढरपूरात सुधाकरपंतांची ताकद मोठी आहे. साहजिकच ते उभे राहिले तर भालकेंना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादीतून हकालपट्टी केलेला ‘हा’ नेता थेट तुरूंगातून लढवणार निवडणूक – https://t.co/6d553fRvsy @NCPspeaks @BJP4Maharashtra @INCMaharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019
“महाराष्ट्राचा सह्याद्री अभेद्य पाठीशी… आम्हाला काय कुणाची भिती”https://t.co/N8MOcKG3gi @dhananjay_munde @PawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019
बाळासाहेबांनी उद्धवपेक्षा माझ्यावर जास्त प्रेम केलं- नाराणय राणे https://t.co/e3CDCuUnBQ @MeNarayanRane
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 22, 2019