महाराष्ट्र सोलापूर

राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारानं दाखवला मनाचा मोठेपणा; राहता बंगला दिला क्वारंटाईनसाठी

सोलापूर | पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी जिल्हा न्यायालयाजवळ असलेला त्यांचा दुमजली बंगला क्वारंटाईनसाठी देणार असल्याचं जाहीर केले आहे. तसं पत्र त्यांनी प्रशासनाला दिलं आहे.

सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदा एका आमदाराने लोकांसाठी आपला राहाता बंगला खाली करुन देण्याचं जाहीर केलं आहे. आमदार भालके यांच्या सामाजिक दातृत्वाचं कौतुक केलं जात आहे.

कोरोनाचा वाढता धोका पाहाता, आमदार भारत भालके यांनी आज आपला राहता बंगला लोकांसाठी खाली करुन देणार असल्याचे जाहीर केले. या दुमजली बंगल्यामध्ये जवळपास 100 हून अधिक बेड बसतील. यासाठी लागणारे सर्व साहित्य देखील आपण उपलब्ध करुन देणार आहे, असंही भालके यांनी सांगितलंय.

दरम्यान, यापूर्वी हातकणंगले मतदारसंघाचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी क्वारंटाईनसाठी स्वत:चे घर दिले. हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावातील बंगला, त्यांनी रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरण : अखेर सत्यशील शेरकर यांच्यावर गुन्हा दाखल

-छोटी राज्यपण तुमच्यासारखी जीएसटीसाठी रडत नाहीत; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

-सरकार भूमिका घेईल असं वाटत नाही, आता नातेवाईक मित्रमंडळींना भेटायला सुरू करा- आंबेडकर

-लॉकडाउन वाढवण्याच्या निर्णयाआधीच बच्चू कडूंनी अकोल्यात संचारबंदी केली जाहीर

-शरद पवारांचं ‘ते’ वक्तव्य ऐकून मी निराश झालो- देवेंद्र फडणवीस