मोठी बातमी! पंडित बिरजू महाराज यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

लखनऊ | देशातील प्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, ते 83 वर्षांचे होते. काल मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. महाराजांच्या निधनाची माहिती त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

पंडित बिरजू महाराज यांचं उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. जाणून घ्या पंडित बिरजू महाराज यांचा जन्म 1938 मध्ये झाला होता. ते लखनऊ घराण्यातील होते. पंडित बिरजू महाराज हे कथ्थक नर्तक तसेच शास्त्रीय गायक होते. पंडित बिरजू महाराज यांचे वडील आणि काका देखील कथ्थक नर्तक होते.

भारतातील महान कलाकारांमध्ये पंडित बिरजू महाराजांचं नाव समाविष्ट आहे. जगभरात त्यांचे लाखो आणि करोडो चाहते आहेत. गायिका मालिनी अवस्थी आणि अदनान सामी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आज भारतीय संगीताची लय थांबली आहे. आवाज शांत झाले. किंमती शून्यावर आल्या. कथ्थकचे राजे पंडित बिरजू महाराज राहिले नाहीत. लखनौची देवधी आज सुनसान झाली. कालिकाबिंदादिनाच्या वैभवशाली परंपरेचा सुगंध जगभर पसरवणारे महाराज अनंतात विलीन झाले. आहाहा! हे कधीही भरून न येणारं नुकसान आहे, असं मालिनी अवस्थीने म्हटलं आहे.

‘अदनान सामीने ट्विटरवर लिहिले की, महान कथ्थक नृत्यांगना पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाच्या वृत्ताने मला खूप दु:ख झालंं आहे. कलाक्षेत्रातील एक अनोखी संस्था आपण गमावली आहे. त्यांनी आपल्या प्रतिभेने अनेक पिढ्यांना प्रभावित केले आहे. त्याच्या आत्म्याला शांती लाभो.

दरम्यान, मी महाराष्ट्राला माझा पिता आणि बंगालला माता मानतो. कारण माझ्या कलेची सुरूवात बंगालमध्ये झाली. पण मला अनेक मानसन्मान व नावलौकिक महाराष्ट्राने दिलं, असं पंडित बिरजू महाराज यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या- 

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! 5 बड्या नेत्यांचा भाजपत प्रवेश 

उदयनराजेंना आवरला नाही ‘पुष्पा’चा मोह, ‘बलम सामे’ गाण्यावर उडवली काॅलर; पाहा व्हिडीओ 

फटे स्कॅम! शेअर मार्केटच्या नावावर बार्शीच्या विशालनं लावला कोट्यावधींचा चुना

“कंडोमपेक्षा कोरोना टेस्ट महत्त्वाची, सेक्सपूर्वी हे नक्की करा”

किरण माने प्रकरणाला वेगळं वळण! सहकलाकारांनी केलेल्या आरोपामुळं खळबळ